आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film News In Marathi, Taptapadi, Cinema, Divya Marathi, Shalaa

मराठीत पीरियड सिनेमांचा ट्रेंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काकस्पर्श, दुनियादारी, शाळा या सिनेमांच्या कथा एका काळाचे प्रतिनिधित्व करतात. त्या वेळची परिस्थिती आणि घडणारी कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटते. अशाच प्रकारचा पीरियड सिनेमाचा प्रयोग आता मराठीतील तरुण कलावंतांनी केला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या दृष्टिदान या कथेवर आधारित ‘तप्तपदी’ हा सिनेमा 28 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.


या सिनेमाच्या टीमने शनिवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सचिन नागरगोजे दिग्दर्शित या सिनेमात कश्यप परुळेकर, वीणा जामकर, श्रुती मराठे, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे अंबरीष देशपांडे आदी कलाकार आहेत.


विशेष म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक सचिन नागरगोजे हा मराठवाड्यातील अंबाजोगाईचा आहे. पुण्यातून मास कम्युनिकेशन केल्यानंतर त्याने अनेक मराठी हिंदी सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. यात ‘सा, रे ग म पा’, ‘राखी का इन्साफ’, ‘शादी 3 करोड की’, ‘गजब देश की अजब कहाणी’ या मालिकांचा समावेश आहे. या नवीन दिग्दर्शकाने मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन कलावंतांना घेऊन चांगली कलाकृती केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कथा आहे. सिनेमात बोल्ड सीन्सही बर्‍यापैकी आहेत. शिवाय टागोरांनी लिहिलेल्या कथेचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान या कलाकारांसमोर आहे.


तरुणांना समोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आजची पिढी ही स्वतंत्र विचार करणारी असून ती उत्तम कलाकृतीला दाद देते. सिनेमाचे पोस्टर जरी देविदाससारखे असले तरी कथानक वेगळे आहे, असे सचिन सांगितले. सुमारे 3 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट असून सिनेमाटोग्राफी, तांत्रिक बाजू आणि गाण्यावर उत्तम काम केले असल्याचे सचिनने सांगितले.