आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Zapatlela 2 Spcial Show For Father Lass Child In Aurangabad

‘झपाटलेला-2’: थ्रीडी सिनेमा पाहून मुले भारावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठीतील पहिला थ्रीडी थरारपट ‘झपाटलेला-2’ या चित्रपटाचा खास शो मंगळवारी (11 जून) 100 अनाथ मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आला होता. ‘ओम फट स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र म्हणत अवतरलेल्या तात्या विंचूने बच्चे कंपनीला मनोरंजनाचा अनोखा आस्वाद दिला. ज्योतीनगरमधील आस्था जनविकास संस्थेच्या वतीने या खास शोचे आयोजन करण्यात आले होते.

20 वर्षांपूर्वी आलेल्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाने मराठी चित्रपटात वेगळे कीर्तिमान स्थापित केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाने तात्या विंचूच्या नावाने मराठीतील अनोखा खलनायक दिला होता. लहान मुलांना तात्या विंचूचे प्रचंड कुतूहल आहे. शहरातील अनाथार्शमांतील मुलांना चित्रपटगृहात जाऊन मोठय़ा पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळत नाही. त्यांना हा चित्रपट पाहता यावा, यासाठी आस्थाने हा उपक्रम हाती घेतला होता. उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या या चित्रपटाचा बच्चे कंपनीने धमाल अनुभव घेतला. आयोजनासाठी संस्थेच्या आरतीश्यामल जोशी, अश्विनी जहागीरदार, रंजना तुळशी यांच्यासह आस्थाच्या सदस्यांनी पर्शिम घेतले.

तात्या विंचू आवडला
तात्या विंचूला आम्ही घाबरलो, पण नंतर खूप मजा आली. मला चित्रपट पाहायला खूप आवडते. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना चांगले वाटले.
-आकाश चव्हाण

धमाल सिनेमा
आम्हाला सगळ्यांना मिळून चित्रपट पाहण्याची ही संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला आनंद खूप वाटला. हा सिनेमा एकदम धमाल आहे.
-जावेद शेख