आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४३ वर्षे जुन्या पुलाला धोका, ... तर इंधन पुरवठा होईल बंद, डागडुजीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - औरंगाबाद-नाशिक राज्य महामार्गावरील खडकी नदीवरील निझामकालीन पूल पूर्ण जीर्ण झाला असून हा पूल १८७४ मध्ये बांधण्यात आल्याचा उल्लेख पुलाच्या खाली भिंतीतील कोनशिलेत आहे. हा पूल दोन विभागांच्या वैजापूर- कन्नड हद्दीत येत असून याचा प्रशासकीय कारभार मात्र तिसऱ्याच खुलताबाद तालुक्यात आहे. या पुलाची आतापर्यंत कधी डागडुजी झाली याची माहितीदेखील खुलताबाद सा.बां. उपविभागाकडे उपलब्ध नाही. महाड व आता सिल्लोड तालुक्यातील पूल तुटल्याच्या पार्श्वभूमीवर खडकी नदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्गावरून दररोज सुमारे ३००० ते ४००० वाहनांची वर्दळ असते.

ब्रिटिशांनाच आपली काळजी
पुलांविषयी ब्रिटिश शासनाने भारत सरकारशी पत्रव्यवहार केला आणि या पुलांवरून वाहतूक करू नये, अशी विनंती केली. पुलाबाबत ब्रिटिश शासनाने कळवले होते. या पत्राची भारत सरकारने दखल घेतलेली नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका
अभियंत्याने सांगितले.
हद्दीचा वाद कायम
देवगाव-गारजदरम्यानच्या पुलावर अपघात झाल्यास अनेक वेळा येथे हद्दीचे वाद होतात. यात अनेकांनी जीव गमावले आहेत. पुलाच्या गारजकडील अर्धी बाजू शिऊर ठाण्यांतर्गत आहे, तर अलीकडील बाजू देवगाव पोलिसांच्या हद्दीत येते.
> ५० मीटर पुलाची लांबी
> २० फूट पुलाची उंची
पुढील स्‍लाइडवर वाचा, ...तर पुरवठा बंद
बातम्या आणखी आहेत...