आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाडचा धडा, कायगावचा जुना पूल विसर्जनासाठी बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील गोदावरी नदीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी औरंगाबाद शहरासह जिल्हाभरातील श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन होणार अाहे. दरम्यान, महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कायगावचा जुना पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला आहे. दुर्घटना घडू नये म्हणून हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, विसर्जन भक्तिपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गंगापूर नगरपालिका, कायगाव ग्रामपंचायत व पोलिसांच्या मदतीने विसर्जनासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, ग्रामपंचायत कायगाव, पोलिस व गंगापूर नगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत दिवसभर विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले. त्यामध्ये विद्युत पुरवठा, वाहतूक, लाइफ जॅकेट्स, विसर्जनाचे ठिकाण निश्चित करून स्वयंसेवक व पोलिसांची मदतीसाठी त्या-त्या ठिकाणी नेमणूक केली. रामेश्वर मंदिर घाटावर विसर्जन व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी औरंगाबाद शहर, गंगापूर तालुका व नेवासा तालुक्यातील गणेश मंडळे येथे येणार असल्याची माहिती आहे.
बातम्या आणखी आहेत...