आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुमताजच नव्‍हे तर दोन हिंदू राजकुमारींसह या 10 जणीही होत्या शहाजहानच्या राण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताजमहल म्‍हटले की शहाबुद्दीन महंमद शाहजहान ऊर्फ शाहजहान यांचे नाव समोर येते. त्‍यांनी आपली पत्‍नी मुमताच हिच्‍या स्‍मृती प्रीत्‍यर्थ ताजमहल बांधला. मात्र, मुमताज या एकट्याच शाहाजहानच्‍या पत्‍नी नव्‍हत्‍या तर त्‍यांच्‍या 10 जणी शाहजनानच्‍या राण्‍या होत्‍या. यात दोघी हिंदू राजकुमारी होत्‍या. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com साठी...
शाहजहान यांचा मृत्यू 22 जानेवारी 1666 रोजी झाला. त्यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर प्रांतात झाला होता. त्यांचे जन्मनाव खुर्रम होते. खुर्रमचा अर्थ आनंददायी असा होतो. भारतावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या मुघल राजघराण्यातील ते पाचवा राजा होते. त्यांनी 1628 पासून 30 वर्षे भारतातील बहुतांश भागावर अधिसत्ता गाजवली.

आई होती हिंदू
अकबर आणि जोधा यांचा मुलगा जहांगिर आणि त्यांची हिंदू राजपूत पत्नी मानमती ऊर्फ ताज बिबी बिल्किस मकानी यांचा ते पुत्र होते. मारवाडचा राजा उदयसिंह यांची मानमती कन्या होती. अकबर आणि जहांगिर यांच्या तुलनेत शाहजहान कट्टर मुस्लिम होते. गैरमुस्लिम लोकांबाबत त्यांची धोरणे कठोर होती.
मुलाने केले कैद
भारतीय सभ्यतेत शाहजहानचे शासन सुवर्ण युग आणि सर्वांत समृद्ध समजले जाते. 1627 मध्ये वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर ते सिंहासनावर बसले. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी तो कायम प्रयत्नशिल होते. परंतु, 1658 मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांचा मुलगा औरंगजेबाने त्यांना कैद करून आग्र्याच्या किल्ल्यात कैद केले. मृत्यूपर्यंत शाहजहान याच किल्ल्यात कैद होते.
त्या काळी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करून ताजमहाल बांधणाऱ्या या सम्राटाचे अंतिम दिवस आग्र्याच्या किल्ल्यातून ताजमहल बघण्यात गेले. औरंगजेबाने नजरकैद केले असल्याने अंतिम दिवसांमध्ये ताजमहालाला स्पर्श करणेही त्यांना शक्य नव्हते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शाहजहानच्‍या राण्‍याविषयी... शाहजहान जिवंत असतानाचा चार मुलांमध्ये सिंहासनासाठी छेडले होते युद्ध...
बातम्या आणखी आहेत...