आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुमताजवर निस्सिम प्रेम करणार्‍या शहाजहानच्या 10 महाराण्या; त्यात होत्या दोन हिंदु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ताजमहल म्‍हटले की शहाबुद्दीन महंमद शहाजहान यांचे नाव समोर येते. शहाजहान यांनी पत्‍नी मुमताच हिच्‍या स्‍मृती पित्‍यर्थ आग्रा येथे ताजमहल बांधला. शहाजहान यांचे मुमताच यांच्यावर निस्सिम प्रेम होते. मात्र, मुमताज या एकट्याच शहाजहानची राणी नव्हती. शहाजहान यांना 10 महाराण्‍या होत्‍या. यात दोन हिंदु होत्‍या. आज आम्ही आपल्यासाठी रोचक कहाणी घेऊन आलो आहे.

शहाजहान यांचा मृत्यू 22 जानेवारी 1666 रोजी झाला. त्यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर प्रांतात झाला होता. त्यांचे जन्मनाव खुर्रम होते. खुर्रमचा अर्थ आनंददायी असा होतो. भारतावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या मुगल राजघराण्यातील ते पाचवा राजा होते. त्यांनी 1628 पासून 30 वर्षे भारतातील बहुतांश भागावर अधिसत्ता गाजवली.

आई होती हिंदु
अकबर आणि जोधा यांचा मुलगा जहांगिर आणि त्यांची हिंदु राजपूत पत्नी मानमती ऊर्फ ताज बिबी बिल्किस मकानी यांचा ते पुत्र होते. मारवाडचा राजा उदयसिंह यांची मानमती कन्या होती. अकबर आणि जहांगिर यांच्या तुलनेत शहाजहान कट्टर मुस्लिम होते. गैरमुस्लिम लोकांबाबत त्यांची धोरणे कठोर होती.

मुलानेच केले कैद...
भारतीय सभ्यतेत शहाजहानचे शासन सूवर्ण युग आणि सर्वांत समृद्ध समजले जाते. 1627 मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते सिंहासनावर बसले. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी तो कायम प्रयत्नशिल होते. परंतु, 1658 मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांचा मुलगा औरंगजेबाने त्यांना कैद करून आग्र्याच्या किल्ल्यात कैद केले. मृत्यूपर्यंत शहाजहान याच किल्ल्यात कैद होते.
त्या काळी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करून ताजमहाल बांधणाऱ्या या सम्राटाचे अंतिम दिवस आग्र्याच्या किल्ल्यातून ताजमहल बघण्यात गेले. औरंगजेबाने नजरकैद केले असल्याने अंतिम दिवसांमध्ये ताजमहालाला स्पर्श करणेही त्यांना शक्य नव्हते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शाहजहानच्‍या 10 राण्‍यांविषयी... शहाजहान जिवंत असतानाचा चार मुलांमध्ये सिंहासनासाठी छेडले होते गृहयुद्ध...
बातम्या आणखी आहेत...