आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahity Sammelan : Sammelan Chairman F.M.Shinde's Gazal Come In Market

मराठी साहित्य संमेलन : संमेलन अध्‍यक्ष फ.मं. शिंदे यांच्या गझलांच्या ध्‍वनिफीत तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ध्वनिफीत (सीडी) रसिकांसाठी दाखल झाली आहे. औरंगाबादचेच युवा संगीतकार आदि रामचंद्र यांनी फमुंच्या सहा गझलांचा अल्बम ध्वनिमुद्रित केला आहे.
संवेदनशील कवी आणि खुमासदार सूत्रसंचालक असा अनोखा मिलाफ झालेल्या फमुंमध्ये एक प्रतिभावान गझलकारही आहे. त्यांच्या गझला ध्वनिमुद्रित स्वरूपात संगीतबद्ध व्हाव्यात, अशी फमुंच्या चाहत्यांची इच्छा होती. ती ओळखून ‘धग’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे संगीतकार आदि रामचंद्र यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार फकिराची मुशाफिरी या अल्बमची निर्मिती झाली. त्यात फमुंचे निवेदन आहे. प्रख्यात गायक पंडित रघुनंदन पणशीकर, आदि रामचंद्र , सायली पानसे यांच्या स्वरात आर्चिस साउंड, पुणे येथे ध्वनिमुद्रण झाले. अल्बमच्या निर्मिती संयोजनासाठी ऋचा शिंदे, पंकजा लाठकर यांनी सहकार्य केले. साउंड इंजिनिअर म्हणून हेमंत घन काम पाहिले. संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे आहे. हार्मोनियमवर मिलिंद वासुदेव कुलकर्णी, तबल्यावर नीलेश रणदिवे यांनी साथसंगत केली आहे. माहिती व तंत्रज्ञानाची जबाबदारी अश्विन जुजगार यांची आहे. ही ध्वनिफीत साहित्य संमेलनात फ.मुं.च्या चाहत्यांसाठी अनोखी सांगीतिक मेजवानी असणार आहे. आदि रामचंद्र यांच्यासाठी प्रख्यात गायक हरिहरन, सुरेश वाडकर, वैशाली सामंत यांनी ‘जागरण’ चित्रपटात गीते गायली आहेत.