आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील या गावात आजही सुरक्षित आहे मोहम्मद पैगंबरांचा पोषाख आणि केस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजरत ख्वाजा बू-हानोदीन यांचा दर्गा - Divya Marathi
हजरत ख्वाजा बू-हानोदीन यांचा दर्गा

औरंगाबाद - जगातील सर्वात मोठ्या धर्मापैकी एक असलेल्‍या इस्‍लाम धर्माचे संस्‍थापक म्‍हणजे मोहम्मद पैगंबर. त्‍यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जाती, धर्म, वर्गापुरती नाही तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याण्‍यासाठी आहे. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते. अशा या महानभूतीला प्रत्‍यक्षात अल्‍लाने भेट दिलेला पवित्र पोशाख आणि त्‍यांच्‍या मिशीचा केस आजही औरंगाबाद जिल्‍ह्यातील खुलताबाद येथील एका दर्गात सुरक्षित ठेवलेला आहे. रमजान इदच्‍या अनुषंगाने या पोषाखाबाबत खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

ईद-ए-मिलादुन्नच्‍या दिवशी या पोषाखाचे दर्शन का ?

750 वर्षांपूर्वी हा पवित्र पोशाख खुलताबादला आणला गेला. तेव्‍हापासून दरवर्षी तो केवळ ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी खुलताबाद येथील हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन शिराजी दर्गामध्ये दर्शनासाठी ठेवला जातो. हा दिवस म्‍हणजे मोहम्मद पैगंबर यांचा जन्‍म दिवस. त्‍यामुळे 365 दिवसांपैकी केवळ याच एका दिवशी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत त्‍याचे दर्शन घेता येते. त्‍यासाठी जगभरातील भाविक रात्रीपासूनच रांग लावतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांना कधी दिला होता अल्‍लाहने पोशाख..... तो खुलताबादमध्‍ये कसा आला.... काय आहे खुलताबादचा इतिहास.... काश्मीरमधील हजरत बल दर्ग्याएवढा मान

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)