आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Study Centre Will Open In Jawaharalal Nehru University

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात होणार मराठी अध्यासन केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्लीच्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) लवकरच मराठी अध्यासन सुरू होणार आहे. यामुळे मराठी साहित्यावरील संशोधन आणि विकासाला गती मिळणार आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. जेएनयूमध्ये मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात प्रयत्न सुरू झाले होते. राज्य आणि केंद्रात काँग्रेसप्रणीत सरकार असल्यामुळे या विषयाला लगेच मान्यता मिळाली. यासाठी राज्य सरकारने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.