आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathon Competition Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयाच्या काळजीसाठी मॅरेथॉन, रॅलीला उदंड प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जगभरात बदललेली जीवनशैली हृदयरोगांना आमंत्रित करत आहे. भारतात हृदयरोग्यांचे प्रमाण वाढले आहे. धूम्रपान आणि तणावग्रस्त जीवनपद्धती, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष यातून हजारो हृदय कमजोर होत आहेत. याविषयीच्या विविध पैलूंवर जनजागृती करण्यासाठी क्रांती चौक ते एमजीएम मैदानापर्यंत जनजागृतीपर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सकाळी साडेदहा ते 11 वाजेदरम्यान झालेल्या या स्पर्धेत हजारांवर आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला.

सपोर्ट लाइफ फाउंडेशन, एमजीएम हार्ट आणि मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सुरुवात केली. तत्पूर्वी सहभागींना 1000 टी शर्ट आणि कॅप्सचे वाटप करण्यात आले. लहान मुलांसह कॉलेजचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. रॅलीच्या सुरुवातीला एमजीएमचे डॉ. अफजल नूर यांनी सांगितले की, हृदयविकाराचे प्रमाण भारतीय समाजात झपाट्याने वाढत आहे. यावर नंतर उपाय करण्याऐवजी आधीच काय उपाययोजना करता येईल, याबद्दल सर्वांमध्ये जागरुकता हवी. आजकाल कुटुंबामध्ये वडील तंबाखू खातात, सिगारेट ओढतात, तर आई सतत टीव्हीसमोर असते. दोघेही पायी चालत नाहीत. व्यायाम करत नाहीत. सातत्याने हॉटेलचे जेवण घेतात. अशा परिस्थितीत मुलांवर आपण कुठल्या जीवनपद्धतीचे संस्कार करत आहोत. याचाही त्यांना विसर पडत चालला आहे. मुलांना आदर्श जीवन पद्धती पालकांनीच वागण्यातून दाखवायला हवी. आईवडिलांचे जीवन आदर्श असल्यास मुले त्याचेच अनुकरण करतील आणि आरोग्यवान होतील, असेही डॉ. अफजल म्हणाले.
स्पर्धेतील विजेते असे
स्पर्धेत पुरुषांमध्ये अविनाश दाणे, किशोर शिंदे, सागर घाटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटाकवले, तर महिलांमध्ये पूजा नरहिरे, सेशा नायडू आणि माधुरी निमे यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील लक्षवेधी स्पर्धक म्हणून 81 वर्षांच्या के. एस. चौधरी आणि दिवाणसिंह यांना सन्मानित करण्यात आले. पारितोषिकांचे प्रायोजकत्व ग्रॅन्ड कल्याण ग्रुपचे गोविंद्र अग्रवाल आणि बुलडाण्याच्या लदाड हॉस्पिटलने स्वीकारले होते. मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने डॉ. फिरोज खान यांनी सहकार्य केले.