आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 19 तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उस्मानाबादेत 963 मिमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात १९ तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा आधिक पाऊस झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ९६३ मिमी   तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकाही तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे  अनेक तालुक्यांना अजूनही परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात केवळ  वैजापूर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून या तालुक्यात  ६२५ मिमी पाऊस झाला असून १३१ टक्के पाऊस झाला आहे. तर औरंगाबाद तालुक्यात ६५४ मिमी पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या ९७ टक्के आहे.  सोयगाव तालुक्यात ४४१ मिमी पाऊस झाला असून  वार्षिक सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे. खुलताबाद ५३०(६६),कन्नड ५७७(७७), गंगापूर ४९३( ७९), फुलंब्री ५४९(८३),पैठण ४५७(६९), सिल्लोड ६१६(९४) टक्के पाऊस झाला आहे.
 
मराठवाड्यात १९ तालुके चिंब
सुरुवातीला पावसाने खंड दिला असला तरी नंतर बरसलेल्या पावसाने मराठवाड्यातील १९ तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली.  तर २८ तालुक्यांनी अपेक्षित सरासरी गाठली.
यामध्ये जालना - ६८९ (१००), वैजापूर ६२५ ( १३१), परतूर ७५३ (१००), अंबड ७०९ (१०६), बीड ६५७ (१०४), पाटोदा ८१७ (१३५), आष्टी ७५० - (१३१), अंबाजोगाई ८०१ - (८१०), केज ८०३ - (१२७), धारूर ६७६ (१०७), लातूर - ७१८ (१००), रेणापूर - ९३५(१३०), निलंगा ७२९ (१०२), शि.अनंतपाळ ७४५ (१०४), उस्मानाबाद ९६३ (१११), तुळजापूर ८३० (१३०), उमरगा ८३७ (१०४), वाशी ७८१ (१०९), परांडा ७४८ (१२१) मिमी  इतका  पाऊस झाला आहे.
 
परभणी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात ५२९ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस झाला आहे. तर जालना जिल्ह्यात ६६७ मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या  ९६ टक्के आहे. हिंगोली ६४२(७१), नांदेड ६१०(६३), बीड ६९५ (१०४), लातूर ७६५(९५ टक्के), उस्मानाबाद ७९९(१०२ टक्के)  पाऊस झाला असून विभागात  ६५७ (८४ टक्के) इतका पाऊस झाला आहे.
 
माहूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस
मराठवाड्यात माहूर तालुक्यात सर्वात कमी ४३८ मिमी इतका पाऊस झाला आहे. मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ३७ टक्के इतका पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस १२४० मिमी माहुर तालुक्यात पडतो. मात्र याच तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.
 
परतीच्या पावसाने दिला आधार
परतीच्या पावसाने मराठवाड्याला मोठा आधार दिला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. या पावसामुळे रब्बीचा हंगाम जोरात येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...