आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: मराठवाड्यात दोन वर्षांत 2186 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांचे प्रमाण 25 टक्क्यांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात दररोज दोन आत्महत्या असे भयावह  चित्र आहे. यंदा साडेतीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत २१८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात ३१ ते ४० या वयोगटातील ५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चाळिशीच्या आतील वयोगटातील आत्महत्यांचे प्रमाण एकूण आत्महत्येच्या २४.३३ टक्के इतके आहे. चाळिशीच्या आतील ९५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून हे प्रमाण ४४ टक्के इतके आहे.  

मराठवाड्यात २०१२ ते २०१५ वर्षे दुष्काळाची ठरली. २०१६ मध्ये चांगल्या पावसानंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत मराठवाड्यात ११३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर २०१६ या वर्षात १०५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
 
तरुण शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या
मराठवाड्यात मागील दोन वर्षांत तरुण शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्याचे दिसते. वयाच्या चाळिशीच्या आतील ९५३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे प्रमाण गेल्या दोन वर्षांतील एकूण आत्महत्यांच्या तुलनेत ४३.५९ टक्के आहे.
 
घरातील लग्न, कुटुंब, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, कुटुंबाचा-आईवडिलांच्या आजारपणाचा, आरोग्याचा खर्च यासह अनेक खर्चांचा ताण याच वयोगटावर पडतो. गेल्या दोन वर्षांत २१८६ पैकी १५७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणात मदत देण्यात आली आहे.
 
शेतीतून नफा थांबल्याचा परिणाम  
गेल्या काही वर्षांत शेती फायद्याची राहिलेली नाही. मागच्या पाच वर्षांपासून शेतीतून नफा येणे थांबलेले आहे. शेतकऱ्यांकडे भांडवल राहिलेले नाही. सरकारची चुकीची धोरणे शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्याऐवजी तोट्यात टाकणारी आहेत. तरुण शेतकरी हा ताण सहन करू शकत नाही. त्यातून नैराश्य अधिक वाढत आहे. शेतीतून नफ्याच्या रूपात वाटा येणे हा प्रकारच थांबला आहे. काहींनी व्यवसाय सुरू केला, मात्र शेती वाचवण्यासाठी व्यवसायातला पैसा शेतीत टाकल्याने शेती व व्यवसाय तोट्यात गेले आहेत.
- गोविंद जोशी, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना न्यास, आंबेठाण, जि. पुणे
 
आत्महत्या चिंताजनक  
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. मराठवाड्यात दुष्काळ, शेतकऱ्यांना होणारा अपुरा पतपुरवठा, शिक्षणाचा वाढलेला खर्च, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे आत्महत्यांत वाढ होत आहे. उत्पादन वाढले असले तरी उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. अन्नसुरक्षासारखे प्रयत्नही शेतकऱ्यांसाठी करण्यात येत आहेत. मात्र, नापिकीमुळे तरुणांमध्ये येणारे नैराश्य चिंताजनक आहे. हे नैराश्य कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
-किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन
 
पुढील स्लाइडवर वाचा, दोन वर्षांतली स्थिती...  आणि - जालना : एका शेतकऱ्यावर सरासरी १.१६ लाखाचे कर्ज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...