आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळाला वर्षाकाठी होतेय २० कोटींचे नुकसान; नांदेड, लातूर, विमानतळ केवळ नावालाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय दर्जाचा औरंगाबाद विमानतळ डबघाईला आला असून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नसल्यामुळे वर्षाकाठी २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद विमानतळांचीही अशीच अवस्था असून ते बंद असल्यातच जमा आहेत. देशातील ९३ विमानतळ तोट्यात असल्याचा अहवाल नुकताच प्रसदि्ध झाला. त्या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी' प्रतिनिधीने माहिती घेतली असता ही बाब समोर आली.
येथील विमानतळावर जेद्दाह वगळता एकही आंतरराष्ट्रीय विमान आलेले नाही. दविसभरात मुंबईसाठी ४ तर दलि्लीसाठी २ विमाने येथे येतात. मध्यंतरी दलि्लीसाठी दोन तर हैदराबाद, त्रिवेंद्रमपर्यंत सेवा सुरू झाल्यामुळे ही संख्या ९ पर्यंत गेली होती. १५ वर्षांपूर्वी उदयपूरसाठीही एक विमान होते. परंतु कमी प्रवाशांचे कारण देत विमान बंद होत गेले.
खर्च जास्त, उत्पन्न कमी
अग्निशामक, एटीसी, एअरलाइन्स, सीआयएसएफ, कमर्शियल अशा विमानतळ प्राधिकरणाच्या ८ विंग्जमध्ये ४०० हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांच्या वेतनावर सर्वािधक खर्च होतो. तर वीज िबल, मेंटेनन्स, गार्डनिंगवरही खर्च होतो.
नांदेडातील विमानतळाचे २००८ मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण केले. किंगफिशरने लातूरमार्गे मुंबईसाठी आठवड्यातून ३ दविस सेवा सुरू केली. तर दलि्ली, नागपूरलाही हवाई मार्गाने नांदेड जोडले. नोव्हेंबर २००९ मध्ये हा विमानतळ रलिायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडे हस्तांतरित झाला. मात्र, २०१३ मध्ये तो बंद पडला. लातूर विमानतळावरही आधुनिकीकरणासाठी २००६ मध्ये १४ कोटी रुपये खर्चले. २००८ मध्ये ते रलिायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लमििटेडकडे ९३ वर्षांच्या लीजवर देण्यात आले. मात्र किंगफिशरचे एक विमान वगळता एकही व्यावसायिक विमान आले नाही व ते बंदच पडले. उस्मानाबाद विमानतळाचा ताबा रलिायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लमििटेडकडे आहे. सध्या ब्लू रे एवि्हएशन अकॅडमीचे केंद्र येथे आहे.