आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada And Vidharbha Independent State Demand

मराठवाडा, विदर्भ वेगळे करा; 5 ऑगस्ट रोजी जंतरमंतरवर आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाडा व विदर्भात विपुल साधनसंपत्ती असतानाही येथील जनतेला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे तेलंगणा राज्याबरोबरच स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा राज्य करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 28 सप्टेंबरपर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास नागपूर कराराची होळी करणार असल्याची माहिती आमदार वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, आसाम, पंजाब या राज्यांनी स्वतंत्र झाल्यानंतर आकाराने लहान राज्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिक सक्षम असतात हे सिद्ध करून दाखवले आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याची माहिती आमदार चटप यांनी दिली. पत्रकार परिषदेला वकील आघाडीचे राज्यप्रमुख डॉ. प्रकाश पाटील, संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, कैलाश तवार, जि. पी. कदम आदींची उपस्थिती होती.

कापूस परिषद 3 ऑक्टोबरला : कापसाला भाव मिळावा यासाठी 2 ऑक्टोबर रोजी पांढरकवडा येथे, तर 3 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.