आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Divided Into Two Parts News In Divyamarathi

मराठवाड्याचे द्विभाजन! बाबांनी टाळले, ते देवेंद्रनी केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नांदेड - मराठवाड्याच्या जिल्ह्यांचे विभाजन करून दोन महसुली विभाग करण्याच्या आघाडी शासनाच्या निर्णयाची अखेर अंमलबजावणी झाली असून पैकी प्रत्येकी जिल्ह्यांचा नवा महसूल विभाग अस्तित्वात येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून हे विभाग अस्तित्वात येतील. स्वतंत्र नांदेड महसुली विभागाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. त्यामुळे मराठवाडा महसूल विभागाचे अखेर तुकडे झाले असून चार जिल्ह्यांसाठी दुसरे आयुक्तालय अस्तित्वात येणार आहे.

कोणत्या विभागात कोणते जिल्हे असणार हे स्पष्ट झाले तरी नव्या विभागाचे मुख्यालय कोठे असेल हे गुलदस्त्यात आहे. अधिकृत जीआर हाती पडल्यानंतर यावर भाष्य करता येईल, असे प्रशासकीय अधिकार्‍यांसह यातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी २००९ मध्ये नांदेडला नवीन आयुक्तालयाची घोषणा केली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नाराज झाले. विलासरावांच्या नाराजीमुळे नांदेड-लातूर या दोन जिल्ह्यांत संघर्षही पेटला होता.

गरज का?
हिंगोलीकिंवा नांदेड जिल्ह्यातील सामान्यांना औरंगाबादला येण्यासाठी अख्खा दिवस खर्ची पडत होता. मुंबई परवडले, पण औरंगाबाद नको, अशी अवस्था होती. अपिलासाठी विभागीय आयुक्तालय जवळ असावे, अशी मागणी होती. त्या गरजेतून प्रशासकीय सोयीसाठी हे विभाजन करण्यात आले आहे.

विभाजनामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. लोकांच्या अनेक समस्या सुटतील. म्हणून फायद्याचा निर्णय आहे. अॅड.प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष,मजविप

मराठवाड्यासाठी ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रशासकीय विकेंद्रीकरण होईल. गुड गव्हर्नन्ससाठी ते फायद्याचे आहे. - शरद अदवंत, सहसचिव,जनता विकास परिषद

औरंगाबाद खंडपीठाने या वादावर दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून आयुक्तालयाची घोषणा करताना काही गोष्टींची पूर्तता झाली नाही हा मुद्दा मान्य केला. सर्व पूर्तता करून आयुक्तालयाबाबत तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश शासनाला दिले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नांदेड-लातूर संघर्ष पाहून याबाबत निर्णय घेण्याचेच टाळले. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली करून अधिसूचना जारी केली.

अशोकराव-विलासरावांत वाद
मराठवाड्यातील दुसरे विभागीय आयुक्तालय नांदेडला असावे अशी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची इच्छा होती, तर ते लातूरला असावे, असे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे म्हणणे होते. यावरून दोघा गुरुभावंडांत कमालीचा वाद झाला होता. मात्र अंतिम निर्णय तेव्हा झाला नाही.

0२ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांच्या हरकती, आक्षेप मागितले
नांदेड विभागातील जिल्हे - नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
औरंगाबाद विभागातील जिल्हे - औरंगाबाद,जालना, बीड आणि उस्मानाबाद

माझ्या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचा आनंद आहे.आधीचे सरकारही हे करू शकले असते. पण तसे झाले नाही. - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री