आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Drought Issue ZP Deputy President Vijaya Chikatgaonkar

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उपाध्यक्षा चिकटगावकर यांनी दिले चार महिन्यांचे मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा परिषदेतील कर्मचारी, ग्रामसेवक तसेच शिक्षक संघटनांनी सामाजिक जाणीव ठेवून दुष्काळग्रस्तांच्या मदतीची तयारी दाखवल्यानंतर उपाध्यक्षा विजया चिकटगावकर यांनी एक पाऊल पुढे टाकले. चार महिन्यांच्या मानधनाचे 16 हजार रुपये देण्याचे त्यांनी गुरुवारी (7 फेब्रुवारी) जाहीर केले.

‘दुष्काळामध्ये कर्मचारी देणार मदतीचा हात’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत चिकटगावकर यांनी प्रशासकीय उपाययोजनांसाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत देत र्शीगणेशा केला. दुष्काळात जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांनी एक दिवसाच्या एक कोटी वीस लाखांच्या वेतनाची रक्कम देण्याची तयारी दाखवली आहे. दुष्काळग्रस्त भागाला वैयक्तिक पातळीवर मदत करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याची भूमिका जिल्हा परिषद अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांनी घेतली. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती डॉ. सुनील शिंदे म्हणाले की, मनसेच्यावतीने तालुक्यात दुष्काळी कामे केली जातील. आरोग्य व शिक्षण सभापती बबन कुंडारे यांनीही विविध कामे करू, असे आश्वासन दिले. समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले यांनी पैठण तालुक्यात सुविधा पुरवण्यावर भर दिला, तर टँकरसह इतर सुविधा देऊ, अशी ग्वाही महिला व बालकल्याण सभापती पूनम राजपूत यांनी दिली.