आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Education Collage Professors Starting Hearing

मराठवाडा अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापकांची होणार सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आपल्या मर्जीतील लोकांच्या नियुक्त्या व्हाव्यात यासाठी मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा अध्यापक महाविद्यालयात 10 प्राध्यापकांची अवैधरीत्या नेमणूक झाल्याचा पर्दाफाश डीबी स्टारने केला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेत प्राचार्यांसह 10 प्राध्यापकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देणारी नोटीस बजावली आहे. याबाबतची वैयक्तिक सुनावणी येत्या 23 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.


राज्यपालांच्या आदेशानंतर मराठवाडा अध्यापक महाविद्यालयाची चौकशी डॉ. शेटकर समितीच्या वतीने करण्यात आली होती. यात प्राचार्यांसह 10 प्राध्यापकांची नियुक्त्या अवैध असल्याचा ठपका समितीने ठेवला होता. यानुसार विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु केवळ सुनावणी आणि प्राध्यापकांचे वारंवार म्हणणे एकूण घेण्यात वेळ मारून निण्याचा प्रताप सुरू होता. याबाबत डीबी स्टारने 10 व 11 एप्रिल रोजी ‘र्मजीतील लोकांसाठी भरतीत शाळा’ व ‘विषयाचे ज्ञान, पदवी, गुण नाही’ या मथळ्याखाली दोन वृत्ते प्रसिद्ध केली. त्यामुळे सार्‍यांचेच धाबे दणाणले. अखेर वेळ मारून नेणार्‍या विद्यापीठाने हे प्रकरण गांभीर्याने घेते दुसर्‍या दिवशी 12 एप्रिल रोजी प्राध्यापकांना नोटिसा बजावल्या आहेत. ही सुनावणी संचालक (बीसीयूडी) डॉ. शिनगारे, रजिस्ट्रार डॉ. डी. आर. माने, परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण, वित्त अधिकारी डॉ. सांगळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.


काय आहे नोटिसांमध्ये
कुलगुरू विजय पांढरीपांडे यांच्या आदेशानुसार संचालक डॉ. शिनगारे यांनी काढलेल्या नोटिसांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मराठवाडा अध्यापक महाविद्यालयातील अध्यापक पदाच्या मान्यतेबाबात अपिलीय अधिकारी तथा संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत व्यवस्थापन परिषद कक्ष येथे 23 एप्रिल रोजी सकाळी 12.30 वाजता नियमात विहित केल्यानुसार वैयक्तिक सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान अध्यापक पदाच्या मान्यतेविषयी संबंधित सर्व मूळ दस्तऐवज तसेच पूरक माहितीसह उपस्थित राहून आपली बाजू मांडावी. या सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहिल्यास आपले काही म्हणणे नाही, असे ग्राह्य धरून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.


कोण आहेत प्राध्यापक
प्राध्यापकांच्या नियुक्त्या देताना शैक्षणिक अर्हता न तपासणे, चुकीच्या जाहिराती देऊन शासनाची दिशाभूल करणे, शासनाचा प्रतिनिधी नसणे, पदवी एका शाखेची- भरती दुसर्‍याच विषयाची असे विविध कारनामे करून चुकीच्या पद्धतीने भरती केल्याचा ठपका डॉ. गणेश शेटकर समितीने ठेवला आहे. त्यात प्राचार्य डॉ. सोहेल अहेमद खान, सहयोगी प्राध्यापिका डॉ. नवीद उस सहर, सहयोगी प्राध्यापिका डॉ. मोईन फातेमा, डॉ. मिर्झा महेफूज बेग, डॉ. शेख इम्रान रमाजान, डॉ. तलत नसीर, डॉ. ऊर्मिला परळीकर, वहिदा हारून, डॉ. खान झीनत मुजफ्फर, डॉ. मुन्तजीब अली बेग, खान तनवीर हबीब यांचा समावेश आहे.