आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मराठवाड्यात काट्याची टक्कर; दिग्गजांची धाकधूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड महिन्यापासून एकमेकांच्या विरोधात धडाडणार्‍या प्रचाराच्या मुलूख मैदानी तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र आहे. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या सभेने वातावरण पार ढवळून निघाले. राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बीड मतदारसंघात या वेळी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान खासदार गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे राज्यमंत्री सुरेश धस यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे.

बीड : देशाचे लक्ष लागल्याने चुरस वाढली
बीड लोकसभेसाठी यंदा 39 उमेदवार रिंगणात असले, तरी राष्ट्रवादीचे सुरेश धस आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्यातच दुरंगी लढत रंगणार आहे. सुमारे 2165 मतदान केंद्रांवर 17 लाख 72 हजार 189 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने राज्यमंत्री सुरेश धस हा तगडा उमेदवार दिल्याने सामना रंगणार आहे. या शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्तिश: बीडवर जास्त लक्ष केंद्रित केले. मुंडेंना पराभूत करण्याचे नियोजन आखून त्यांनी गेवराई, बीड, आष्टी, अंबाजोगाईत जाहीर सभाही घेतल्या. बीडमध्ये मुक्काम ठोकला. पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समेट घडवून मनोमिलनाचा प्रयत्न केला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धस यांना मताधिक्य न देणार्‍याला विधानसभेत तिकीट दिले जाणार नाही, अशी तंबी दिल्याने सगळेच नेते जोमाने कामाला लागले.