आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलींचा जन्मदर कमी होत चालल्याचा निष्कर्ष 2010च्या जनगणनेच्या आकडेवारीतून समोर आला तेव्हा राज्य सरकारची झोप उडाली होती. मात्र, नंतरच्या काळात आरोग्य विभागाने सोनोग्राफी सेंटरवर केलेल्या कारवाया आणि मुलींचा जन्मदर राखण्यासाठी उचललेली पावले फलदायी ठरली आहेत. दोन वर्षांत मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.

विविध यंत्रणांच्या माध्यमातून सरकारने स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी केलेल्या कारवाया आणि त्याच काळात काही अंशी याबाबत जागृतीचा परिणाम पाहता आता हजार पुरुषांमागे महिलांचे सरासरी प्रमाण चांगले आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

औरंगाबाद उपसंचालक कार्यालयातून मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा कारभार हाकला जातो. यात औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. मुलांमागे मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने केलेल्या कारवाईनंतर 4 जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबत माहिती प्रथमच समोर आली आहे.

रेडझोन झाले ग्रीन झोन
2010 च्या जनगणनेत औरंगाबाद, बीड व जालना हे जिल्हे ‘रेडझोन’ मध्ये होते. मराठवाड्यातील मुलींची संख्या सर्वांत कमी असलेले हे जिल्हे होते. आता मात्र हे जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये आले आहेत.

अशा झाल्या कारवाया
0 स्त्रीभ्रूणहत्येबाबत बीड येथील डॉ. सुदाम मुंडे यांच्या कुकृत्यांमुळे मराठवाडा राज्यात गाजला. गर्भातच मुलींची क्रुरपणे हत्या करण्याचा हा प्रकार डॉक्अरी पेशाला काळिमा लावणारा ठरला.
0 महाराष्ट्र आरोग्य विभागाने यावर लक्ष केंदित करून अनेक रुग्णालये आणि डॉक्टरांवर कारवाई केली. स्टिंग ऑपरेशन करून अनेकांवर फौजदारी खटले दाखल केले.
0 आरोग्य विभागाच्या धडक कारवाईमुळे डॉक्टर लॉबीचे धाबे दणाणले. परिणामी मुलींचा जन्मदर राखता आला.

व्हिजिलन्स स्कॉडचाही दरारा
आरोग्य यंत्रणेला काम करीत असताना पुढारीवर्गाचा होणारा त्रास टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथमच डिसेंबर 2011 साली ‘व्हिजिलन्स स्कॉड’ची स्थापना केली. यामुळे कायदेशीर सल्ला व पोलिसांची मदत मिळाली.