आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील ५३ नगरपालिकांची केवळ २०% वसुली, वसुलीचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील सर्व ५३ नगरपालिकांची मालमत्ता आणि पाणीपट्टीची केवळ २० टक्के वसुली झाली. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत ८० टक्के वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वसुली सर्वाधिक असून लातूर जिल्ह्यातील सर्वात कमी आहे.
नगरपालिकेअंतर्गत नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी सुविधा दिल्या जातात. या सुविधांपोटी नागरिकांकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी यासह इतर करांची वसुली केली जाते. मात्र मार्च जवळ आल्यानंतरच वसुलीसाठी आटापिटा केला जातो. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वसुली फारशी होत नसल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील मालमत्ता कराची वसुली करण्यात नगरपालिका प्रशासन सातत्याने उदासीन दिसत आहे. नगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण व्हावे यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातून दरमहा अहवाल मागवला जातो. मात्र जिल्ह्यातून हा अहवाल पाठवण्याबाबतही उदासीनता दिसून येते. मार्च जवळ आल्यानंतर प्रशासन धावपळ करते. मात्र त्यामुळे अपेक्षित वसुली होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीदेखील नगरपालिका प्रशासनाची २१ कोटी ४६ लाख रुपयांची वसुली बाकी आहे. यावर्षी ५२ कोटी ४९ लाखांपैकी १० कोटी ८३ लाख इतकी वसुली झाली आहे. उर्वरित वसुली करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे. पाणीपट्टीची गेल्या वर्षीची २८ कोटी २५ लाख इतकी थकबाकी नगरपालिका प्रशासनाची आहे. यावर्षी ५९ कोटी ७४ रुपयांपैकी केवळ कोटी १८ लाख इतकी वसुली झाली असून हे प्रमाण १३.७१ टक्के इतके आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात केवळ टक्के पाणीपट्टी वसूल झाली आहे. दरम्यान, दुष्काळामुळे मराठवाड्यात नगरपालिका क्षेत्रातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातून एकवेळ पाणी येत असल्याने नागरिक पाणीपट्टी भरण्यासही अनुत्सुक आहेत.
मालमत्ता वसुली जिल्हानिहाय
परभणी -२६५-५९-२२.४० %
उ.बाद -८८१-१३७-१५.६४%
लातूर -२७८ -५० -१८.२४ %
बीड -१२०६ -२३१ -१९.२२ %
नांदेड -७५९-१५४ -२०.३६ %
हिंगोली -२६५ {६१ {१९ %
जालना -९९४-२५१-२५.३२ %
औरंगाबाद -५४२-१३५-४७.५२%
एकूण- ५२४९-१०८३-२०.६५%(आकडे लाखात)

नगरपालिकांची वसुली दहा टक्केही नाही
गंगापूर ८.९६ %
गंगाखेड ८.५२ %
बिलोली ९.९१ %
लोहा ७.५९%
भोकर ७.५९ %
परळी ८.५० %
धारूर ४.५२ %

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक वसुली
आठहीजिल्ह्यांतील ५३ नगरपालिकांमध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता करवसुलीत औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. यामध्ये मालमत्ता वसुलीमध्ये जिल्ह्यातील कोटी ४२ लाखांपैकी कोटी ३५ लाख वसूल झाली आहे, तर पाणीपट्टीतही कोटीपैकी जवळपास कोटी १७ लाख रुपये वसूल झाले आहेत.
प्रशासनाची उदासीनता
बातम्या आणखी आहेत...