आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Literature Meeting Will Jalana From April In Jalna

निमंत्रण न मिळाल्याने नाराजी, मराठवाडा साहित्य परिषदेचे संमेलन आजपासून जालन्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेचे ३७ वे मराठवाडा साहित्य संमेलन एप्रिलपासून जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. मात्र, अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना संमेलनाचे निमंत्रण मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. सूत्रांच्या मते काही ज्येष्ठ लेखक, लेखिकांना आमंत्रण मिळाले नाही. तसेच त्यांना कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले नाही. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जालन्यातील श्रीगुरू गणेश साहित्यनगरीत हे संमेलन होत आहे. आजवर निमंत्रण पत्रिकेतील चुका, अध्यक्षांची निवड या कारणामुळे हे संमेलन गाजले आहे. संमेलनात ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग असावा यासाठी खास अादरातिथ्यही केले जाते. मात्र, या वेळी अनेक ज्येष्ठ लेखकांना यातून डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे.

दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता कविवर्य भ. मा. परसवाळे यांची मुलाखत डॉ. संजीवनी तडेगावकर आणि प्रा. पृथ्वीराज तौर घेणार आहेत. प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली "मराठी कवितेला मराठवाड्यातील कवींचे योगदान' या विषयावर परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. पी. विठ्ठल, प्रा.डॉ. केशव देशमुख, प्रा. डाॅ. शशिकांत पाटील, प्रा. डॉ. केशव तुपे, प्रा. डॉ. कल्पना जाधव, प्रा. भाऊसाहेब राठोड यांचा सहभाग असेल. दुपारी साडेबारा वाजता प्राचार्य भगवान देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. त्यात राम निकम, सत्यशीला ताैर, विठ्ठल बोकन, स्वाती कान्हेगावकर, अंबादास केदार, भास्कर बडे या कथाकारांचा सहभाग असेल. दुपारी अडीच वाजता प्रा. भगवंत क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली "अराजकतेच्या काळात संत साहित्य हेच खरे उत्तर' या विषयावर कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली "महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राची अवकळा, नोकरशहा आणि मराठी राजकारणी' या विषयावर परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. शेषराव मोहिते, अमर हबीब, सुधीर महाजन, कैलास अंभोरे, रामचंद्र तिरुखे, श्रीधर नांदेडकर यांचा सहभाग असेल. त्यानंतर कविसंमेलन आणि बालमेळावा होईल.