आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा विशेष क्षेत्र जाहीर करा; केंद्रीय पथकाला साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा विभाग चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. या विभागातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी संपूर्ण मराठवाडा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावे तसेच एकात्मिक विकास कार्यक्रम प्राधान्याने राबवावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने केंद्रीय पथकाकडे केली आहे. रविवारी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाशी भेट घेत मराठवाड्यातल्या प्रश्नाची चर्चा केली.
मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, गोपीनाथ वाघ, वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे, डॉ शरद अदवंत, यांनी केंद्रीय पथकाची भेट घेतली. या वेळी पथकाचे प्रमुख डॉ. एस.के.मल्होत्रा, जगदीश कुमार,एच.आर. खन्ना, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, उपायुक्त किशनराव लवांडे, उपायुक्त जितेंद्र पापळकर यांची उपस्थिती होती.

चित्रकूटच्या धर्तीवर मदत करा
मराठवाड्यातीलशेतकऱ्यांना तत्कालिक मदत म्हणून किसान कार्ड योजना राबवावी. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपये क्रेडिट कार्ड देत किसान कार्ड योजना राबवाबी. त्यावर कोणतेही व्याज आकारता त्याची परतफेड तीन वर्षांनंतर करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.

तसेच चित्रकूट परिसरात प्रत्येक कुटुंब आणि गाव स्वंयपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसाच पथदर्शी प्रयोग मराठवाड्यात राबवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच कलम ३७१ (२) अन्वये मराठवाड्याला विशेष स्थान असल्यामुळे तसेच मराठवाड्यातील आठही जिल्हे अतिमागास असल्याने तातडीने विशेष योजना राबवावी, अशी सूचना अदवंत यांनी या वेळी केली.