आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मे महिन्याअाधी विभागीय आयुक्तालयाचे विभाजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या आयुक्तालयाच्या विभाजनाचा निर्णय १ मे २०१६ पूर्वी होईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. विभाजनाचा अहवालही शासनाला मिळाला असून त्याची पडताळणी सुरू असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही खडसेंनी औरंगाबादेत स्पष्ट केले.
औरंगाबाद आयुक्तालयाच्या विभाजनासाठी आंदोलनेही झाली होती. विलासराव देशमुख यांनी लातूर, तर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आयुक्तालय व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे नांदेड की लातूर या वादात हा निर्णय झाला नाही.
खडसे म्हणाले, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट समितीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. यामध्ये त्यांनी काही शिफारशी केल्या आहेत. भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, यासह इतर निकष पाहून तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.