आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचा विकास उदासीनतेनेे झाला ठप्प, रेल्वेविकास समिती करणार उपोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादला राज्य सरकारने पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले. पण नगर, नाशिकचे लोक मराठवाड्याला पाणी देत नाहीत. दक्षिण मध्य रेल्वे नवीन रेल्वे सुरू करत नाही. रखडलेले मार्ग पूर्ण करण्यासही विलंब होतो. जाब विचारल्यास चुकीची माहिती दिली जाते.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही ते जुमानत नाहीत. मुख्यमंत्री स्थानिक राजकीय नेत्यांना याविषयी माहिती देऊनही उपयोग होत नाही. या उदासीन धोरणामुळेच मराठवाड्यावर अन्याय होत आहे, असा सूर मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या पत्रकार परिषदेत उमटला. याकडे स्थानिक नेत्यांचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून रखडलेला दुहेरी रेल्वे मार्ग, रोटेगाव ते कोपरगाव ३५ किमीचा मार्ग, औरंगाबाद -दौलताबाद- कन्नड- चाळीसगाव आणि सोलापूर-तुळजापूर-जळगाव महामार्गाची कामे आणि लांब पल्ल्याच्या नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर सेवा-सुविधांच्या बाबतीत शून्य प्रगती आहे. या प्रश्नांसाठी ३० वर्षांपासून मराठवाडा रेल्वे विकास समिती लढा देत आहे. लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा भेटलो. आ. अतुल सावे, इम्तियाज जलील यांनाही निवेदने दिली. त्याचा उपयोग झाला नाही. खा. रावसाहेब दानवे यांनी जनशताब्दी सोलापूर नवीन रेल्वे जालन्याकडे वळवल्या. यात खा. चंद्रकांत खैरे, स्थानिक लोकप्रतिनिधी जनसहभाग कमी पडल्याची खंत वर्मा यांनी व्यक्त केली.

लढातीव्र करावा लागणार
नवीनरेल्वे आणि रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी यासाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना भेटून चर्चा केली. त्यांनी लगेच दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. हा अन्याय मराठवाड्यातील जनतेने किती दिवस सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित करून न्यायासाठी लढा तीव्र करावा लागणार असल्याचे ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले. उपोषणाने त्याची सुरुवात करत असल्याचे ते म्हणाले. या वेळी तारा लड्डा, सुधाकर चव्हाण, अजय शहा, तनसुख झांबड, रशीदमामू, लक्ष्मीनारायण राठी उपस्थित होते.

रेल्वेचीसंख्या नगण्य
कोल्हापूरआणि मुंबईसाठी आवश्यक रेल्वे सुरू केल्या. मात्र औरंगाबाद ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी, मुंबई) ला जाण्यासाठी रेल्वे नाही. दादरला मध्येच उतरून दिले जाते. रेल्वेची संख्या नगण्य आहे. पुण्याच्या विकासासाठी तेथील लोक एकत्र येतात. त्यामुळे सर्वच बाबतीत त्यांचा विकास झालेला आहे. त्याच धर्तीवर राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी आणि जनतेने एकत्रित येऊन मराठवाड्याच्या विकासासाठी लढा देण्याची गरज आहे. शर्मा यांच्या बरोबरीने आपणही या आंदोलनात सहभागी असल्याचे स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा यांनी सांगितले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय शहा यांनी, लवकरच बैठक घेऊन या लढ्यात सहभागी होण्याची भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.

राजकीय अनास्थेमुळेच
राजकीयअनास्थेमुळे रेल्वे आणि पाणीप्रश्नाची अनेक वर्षापासून तड लागू शकली नाही. याकडे स्थानिक नेत्यांचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने २३ नोव्हेंबरला विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.