आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Sahitya Parishad Award Declear Aurangabad

ना. धों. महानोर, डॉ. चंद्रकांत पाटील यांना मसापचा जीवनगौरव पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा कविवर्य ना. धों. महानोर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे.

मसापच्या कार्यकारिणी बैठकीत रविवारी हा निर्णय घेण्यात आला. मराठी साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणार्‍या आणि मसापच्या उभारणीत योगदान असणार्‍या साहित्यिकांना दर तीन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. 25 हजार रुपये रोख, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना देण्यात आलेला आहे. नांदेड येथील दिवंगत कवयित्री लीला धनपलवार यांच्या नावाने दरवर्षी मराठीतील एका नामवंत कवीला हा पुरस्कार देण्यात यावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 11 हजार रुपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. या वर्षीपासून पुरस्कार देण्यात येईल. पुरस्काराचा प्रस्ताव लीला धनपलवार यांचे पती दत्तात्रय धनपलवार व पुत्र डॉ. उदय उमरीकर धनपलवार यांनी परिषदेकडे दिला होता. या प्रस्तावाला मान्यता देऊन पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय झाला. बैठकीस मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह के. एस. अतकरे, डॉ. सुरेश सावंत, प्रा. किरण सगर, डॉ. भास्कर बढे, सुधाकर महाजन, प्रभाकर पाठक, प्रा. रसिका देशमुख, डॉ. हेमलता पाटील, प्रा. श्रीधर नांदेडकर उपस्थित होते.