आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांपासून मसापला पडला निवडणुकीचा विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेने निवडणुकीचा कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी जाहीर करूनही निवडणूक घेतली जात नसल्यामुळे साहित्यिकांमध्ये परिषदेविषयी नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. दरम्यान, कार्यवाह कुंडलिक अतकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे कारण समोर केले आहे.

परिषदेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी निवडणूक घेणे अपरिहार्य आहे. असे असतानाही मागील सात वर्षांपासून निवडणूक घेण्यात आली नाही. मसापने निवडणुकीचा पंचवार्षिक कार्यक्रम २९ जूनला झालेल्या बैठकीत जाहीर केला होता. तसे परिपत्रकही जारी करण्यात आले होते. वेळापत्रकानुसार ३१ आॅगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यवाहकांनी मतदारांची यादी व वेळ प्रसिद्ध करण्याचे निश्चित केले होते. मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख ही १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० पर्यंत देण्यात आली होती. १ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत आक्षेपांची तपासणी करून निर्णय देण्याचे ठरले होते. १६ ऑक्टोबरला अंतिम यादी निश्चित करून २० ऑक्टोबरला निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांकडे देण्याचे ठरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१२ मध्ये म्हणजे दोन वर्षांपूर्वीच या निवडणुका जाहीर व्हायला हव्या होत्या. मात्र, नवीन घटना दुरुस्तीच्या नावाखाली त्या लांबवण्यात आल्या. खरे तर आतापर्यंत यादी तयार होऊन नवीन कार्यकारिणी तयार व्हायला हवी होती. तसे काहीही न करता परस्पर पासबुक तयार करून नवीन ११०० सदस्य नोंदवण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये घेण्यात आले. आता तर ही रक्कम पाच हजारांवर गेली आहे.

नोव्हेंबरमध्ये निवडणुका
लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे मसापचे निवडणूक वेळापत्रक जाहीर होऊनही त्या घेता आल्या नाहीत; परंतु आता कामास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबरमध्ये त्या घेण्यात येतील.
कुंडलिक अतकरे, कार्यवाह, मसाप