आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाने संस्थेच्या रचनात्मक बदलासंबंधी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यात खंडपीठाने यापूर्वी दिलेली स्थगिती कायम केली आहे. प्रकरण नॉट बिफोर मी झाल्याने पुढील सुनावणी 4 ऑक्टोबर रोजी खंडपीठात होईल.
मंडळाच्या निवडणुकीची अधिसूचना 18 जून 2013 रोजी जारी करण्यात आली. सदस्यांनी निवडणुकीसाठी निरीक्षकाची नेमणूक करावी, असा अर्ज सहधर्मदाय आयुक्तांकडे केल्यानंतर 9 जुलै 2013 रोजी निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास मंडळाचे तत्कालीन सचिव मधुकरराव मुळे यांनी खंडपीठात आव्हान दिले. विश्वनाथ तुपे पाटील व इतरांनीही निवडणूक बेकायदेशीर ठरविण्याची मागणी स्वतंत्र याचिकेद्वारे केली होती. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक 10 जुलै 2013 रोजी पार पडली. निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश सोळुंके तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली. दोन्ही याचिका सुनावणीसाठी खंडपीठासमोर आल्या असता, खंडपीठाने विश्वस्त संस्थेसंबंधी कुठलाही धोरणात्मक निर्णय नवनियुक्त कार्यकारिणीने घेऊ नये, असे आदेश दिले. याचिकेची सुनावणी गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी झाली असता, खंडपीठाचे न्या. के. यु. चांदिवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी प्रकरण नॉट बिफोर मी केले.
मधुकरराव मुळेंतर्फे अँड. ए. सी. धर्माधिकारी, विश्वनाथ तुपे पा. यांच्याकडून अँड. प्रमोद पाटणी, सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किशोर गाढवे पा., सभासदांतर्फे अँड. दिलीप चौधरी व अँड. नंदकुमार खंदारे, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव लहानेंच्या वतीने अँड. भरत वर्मा यांनी काम पाहिले. अविनाश येळीकर यांच्या वतीने अँड. विनोद ठोळे यांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.