आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी रस्त्यात बंद पडली तर फक्त कॉल करा; जागेवर दुरुस्त करून देऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आडमार्गाला दुचाकी बंद पडली की गॅरेज शोधताना वाहनधारकांची दमछाक होते. त्यात महिलांना मोठा त्रास होतो. ही गैरसोय लवकरच दूर होणार आहे. तुमची दुचाकी कुठेही बंद पडली तर फक्त एक कॉल करा, आम्ही ती गाडी जागेवर येऊन दुरुस्त करून देऊ, अशी सोय मराठवाडा टू व्हीलर गॅरेज संघटनेने पहिल्या वर्धापन दिनापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात आजवर गॅरेज संघटना नव्हती. मागच्या वर्षी शहरातील साठपेक्षा जास्त टू व्हीलर गॅरेज चालवणाऱ्यांनी एकत्र येत सिडकोतील रवींद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना स्थापन केली. संघटनेने गॅरेज मालकांचा शैक्षणिक स्तर उंचावणे, फावल्या वेळेत सभासदांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. बेसिक इंग्रजीसह संगणक अभ्यासक्रम, विविध कंपन्यांची माहिती, स्पेअर पार्ट््स, नवी विक्रीची दालने कुठे आहेत याची माहिती दिली जाणार आहे.

१६ सप्टेंबरला वर्धापन दिन
१६सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते या वेळेत मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे संघटनेचा पहिला वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने शहरात गॅरेज चालवणाऱ्यांसाठी स्पेअर पार्ट स्टॉलचे प्रदर्शन सकाळी ११ ते या वेळेत आहे. दुपारी ते या वेळेत महेश ऑटोतर्फे टू व्हीलर रिपेअरिंग कार्यशाळा ठेवण्यात आली आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार उत्तमसिंह पवार उपस्थित राहतील. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा टू व्हीलर गॅरेज संघटनेचे अध्यक्ष नदीम शेख, उपाध्यक्ष दादासाहेब तांबे, सचिव चंद्रशेखर पवार, मार्गदर्शक रवींद्र राऊत यांनी केले आहे.

अॅप विकसित करणार
^संघटनेच्या वतीने लवकरच एक अॅप विकसित केले जाणार असून त्याद्वारे लोकांना मदत केली जाईल. गाडी जेथे बंद पडली असेल त्या ठिकाणी संघटनेच्या गॅरेजचा माणूस पोहोचून गाडी दुरुस्त करेल. रवींद्र राऊत, मराठवाडा टू व्हीलर संघटना.
बातम्या आणखी आहेत...