आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’; 15 हजार कोटींची योजना; गावांना शुद्ध पाणी मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर राबवण्यात येत असलेल्या वॉटर ग्रीड योजनेसाठी साधारण १५ हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. गुरुवारी विभागीय आयुक्तालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. औरंगाबाद महापालिकेने मागणी केल्यास योजनेत औरंगाबादचाही समावेश होऊ शकेल, असे ते म्हणाले.

गुजरातेतील कच्छ प्रांतात पिण्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नर्मदा नदीचे पाणी ग्रीडद्वारे देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यात ही योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लोणीकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह २२ अधिकाऱ्यांनी गुजरात, तामिळनाडूतील योजनेचा अभ्यास दौराही केला. लोणीकर म्हणाले, मराठवाड्यातील शहरी भागात सध्या ५३ लाख ९५ हजार, ग्रामीणमध्ये कोटी ३३ लाख योजनेत यांचा समावेश करण्यात आला आहे.
> मनपा, ५० नगरपालिका, २५ नगर पंचायत, ६६४५ ग्रामपंचायत, ८२९५ गावे, १२९७८ गावे आणि वाड्या
> शहरी भागासाठी दररोज दरडोई १३५, तर ग्रामीणमध्ये ७० लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट.
बातम्या आणखी आहेत...