आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ऑगस्टपर्यंत मिळणार मराठवाड्याला चारा-पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती बिकट असली तरी येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी व चारा उपलब्ध असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी सांगितले.

राज्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कदम यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 8 जुलैनंतर चांगल्या पावसाची शक्यता असली तरी खात्री नाही. तरी 15 ऑगस्टपर्यंत पाण्याची चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठय़ासाठी जिल्हाधिकार्‍यांना अधिकार देण्यात आल्याचेही ते म्हणाले. टंचाई निवारणासाठी लागणार्‍या निधीत कसलीही कपात केली जाणार नाही, अशी ग्वाही कदम यांनी या वेळी दिली.

66 कोटी दोन दिवसांत
मराठवाड्यातील शेतकर्‍यांना वाटप करायचे 66 कोटी बँकेत पडून आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन दिवसांत वाटप केली जाईल, तसेच आदेश देण्यात आल्याचे कदम यांनी या वेळी सांगितले.

(फोटो - पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम)