आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत गारपिटीची शक्यता; बदलत्या हवामानाचा परिणाम दुष्काळी भागात जाणवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हवामानातील बदलामुळे येत्या दोन दिवसांत येवला, नांदगाव, वैजापूर आणि औरंगाबाद शहराच्या उत्तर भागात गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अटलांटिक वोशंट वारे ईशान्य मोसमी वार्‍याच्या संपर्कात आल्यामुळे उत्तर भारतात पाऊस पडत आहे. तसेच काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. तिबेटकडून येणारे थंड वारे आणि हिंदी महासागरात वाहणारे गरम वारे यांचा ईशान्य वार्‍याशी पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतात, विशेषत: राजस्थानच्या वायव्य भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व बदलाचा परिणाम महाराष्ट्राच्या दुष्काळप्रवण क्षेत्रात होताना दिसत आहे.

नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नायगाव, हदगाव, उमरी तालुक्यात गारपीट झाली. काही दिवसांपूर्वी वाशीम जिल्ह्यात दीड तास मुसळधार पाऊस पडला होता.

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. औरंगाबाद शहरातही अधूनमधून पावसाचे थेंब पडतात. मात्र, येत्या दोन दिवसांत काही भागात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ र्शीनिवास औंधकर आणि हवामान अभ्यासक आर. के. मुंगोणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना वर्तवली आहे.

थंडी लांबणार
पश्चिम विक्षेपामुळे मार्चपर्यंत थंडी लांबणार आहे. तीन दिवसांत राज्यातील अनेक भागांत पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. र्शीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ.

थंडीचा मुक्काम 15 मार्चपर्यंत
हवामानात बदल होत आहेत. येत्या तीन दिवसांत येवला, नांदगाव, वैजापूर आणि औरंगाबाद शहराच्या उत्तर भागात गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे 15 मार्चपर्यंत थंडी लांबणार आहे. हिवाळ्यात पडणारा बर्फ येत्या पावसाळ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आर. के. मुंगोणे, हवामान अभ्यासक