आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील पहिला कम्युनिटी रेडिओ 15 ऑगस्टपासून, एमजीएमचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेडीओ स्टेशनच्या स्टुउिओचे काम अंतीम टप्पयात आहे. - Divya Marathi
रेडीओ स्टेशनच्या स्टुउिओचे काम अंतीम टप्पयात आहे.
औरंगाबाद- मराठवाड्यातील पहिल्या कम्युनिटी रेडिओला यंदाच्या स्वातंत्र्य दिनापासून औरंगाबादेत सुरुवात होत असून महात्मा गांधी मिशनला (एमजीएम) हा मान मिळाला आहे. तब्बल १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रेडिओ सुरू करण्यात यश मिळाले. ९०.८…अचूक आणि थेट असे घोषवाक्य असणारा हा रेडिओ करमणुकीसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल. याच्या स्टुडिओ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
 
कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यासाठी एमजीएमने २००८ मध्ये केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे अर्ज केला होता. २०११ मध्ये एमजीएमला मंजुरीचे पत्र, तर २०१२ मध्ये ९०.८ मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीही मिळाली. नंतर मात्र अडथळे येत गेले. एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. दिल्लीला ते १० चकरा मारल्या. केंद्रात सत्तांतर होताच एक दिवस माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातून स्टँडिंग अॅडव्हायझरी कमिटी ऑन रेडिओ फ्रिक्वेन्सी अलोकेशन (सॅक्फा) हे लायसन्स मंजूर झाल्याचा फोन आला. डॉ. शेळके दिल्लीला रवाना झाल्या आणि थेट लायसन्स घेऊनच परतल्या. हे लायसन्स वर्षांसाठी वैध राहील.
 
जनतेच्या संमतीने आखणी
डॉ.शेळके म्हणाल्या, कम्युनिटी रेडिओ असल्याने याचा व्यावसायिक वापर करता येत नाही. एक तासाला मिनिटांच्या जाहिराती घेता येतात. रेडिओ सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल. तो खासगी एफएम किंवा आकाशवाणीपक्षा वेगळा असेल. यातील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी शिक्षण, कायदा, पोलिस, प्रशासन, कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय, तरुणाई आदी क्षेत्रांतील तज्ज्ञांची एक बैठक घेतली जाणार आहे.
 
१५ ऑगस्टपासून ट्रायल रनला सुरुवात
१५ ऑगस्टपासून रेडिओच्या ट्रायल रनला सुरुवात होत असून स्टुडिओ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३५ मीटरच्या टॉवरवर ५० वॅट्सचा ट्रान्समीटर बसवण्यात आला आहे. १७ किलोमीटर अंतरापर्यंत रेडिओ ऐकता येईल. एक प्रोग्रॅम हेड, साउंड इंजिनिअर, दोन आरजे आणि एक मार्केटिंग प्रतिनिधी अशा पाच जणांची येथे नियुक्ती केली जाणार आहे.
 
एक वेळ अशी आली होती की, आम्ही रेडिओ सुरू होण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, प्रकाश जावडेकर यांनी वैयक्तिक लक्ष घातल्याने हे काम पूर्ण झाले. दहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले.
- डॉ. रेखा शेळके, प्राचार्य, जनसंवाद पत्रकारिता महाविद्यालय, एमजीएम
 
बातम्या आणखी आहेत...