आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील पहिले ई टॉयलेट औरंगाबादेत, अॅपवर कळेल ठिकाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश झाला, तरी मनपा अजूनही स्मार्ट होऊन काम करत नाही. दुसरीकडे शहरातील लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद आयकॉन या संस्थेने पुढाकार घेऊन मराठवाड्यातील पहिले ई टॉयलेट शहरात आणले आहे. या आठवड्यात त्याचा शुभारंभ होईल.
 
शहरात महानगरपालिकेची ३५ सार्वजनिक शौचालये असून यातून अनेक शौचालये बंद पडली आहेत. तर अनेक शौचालये अस्वच्छ असल्याने वापराविनाच पडून आहेत. स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेसह शौचालयांना सर्वाधिक प्राधान्यक्रमावर आहेत. त्या दृष्टीने महापालिकेचे नियोजन अजून मूर्तरूप घेण्याच्या आधीच सामाजिक कामात अग्रेसर लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद आयकॉनने चेन्नईच्या धर्तीवर शहरात ई टॉयलेट ही संकल्पना राबवण्यात पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर करण्यासाठी एक यंत्र मनपाला उपलब्ध करून दिले आहे. हे ई टॉयलेट असून केरळमधून मागवण्यात आले आहे. याचा सर्व ६.५० लाख रुपये खर्च लासन्य क्लब ऑफ आयकॉनने केला आहे.
 
अॅपवर कळेल ठिकाण : चेन्नई शहरात मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या ठिकाणी हे टॉयलेट बसविण्यात आले आहेत. ज्या कुणाला टॉयलेट कुठे आहे, याची माहिती टॉयलेट अॅपवर उपलब्ध होत असल्याने नागरिकांना तेथे तत्काळ पोहाेचता येते. आपल्या शहरातही मनपाकडूनही शहरात पहिल्यांदाच ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यासाठी लायन्स क्लबने पुढाकार घेतला आहे. लवकरच ते सुरू करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर ठिकाणी बसवता येईल. सध्या सीएसआर अॅक्टिव्हिटीमधून हे टाॅयलेट कार्यान्वित करण्यात येत आहे, असे मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
 
लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद आयकॉनचे अध्यक्ष भावेश सराफ म्हणाले, मी चेन्नईला गेलो होतो, तेव्हा तिथे हे दिसले. स्मार्ट सिटीत ही संकल्पना राबविण्याचा विचार केला. प्रत्यक्षात ई-टॉयलेट बसविण्यासाठी आठ महिने लागले. मनपाने ई-टॉयलेट्सची संख्या वाढवावी.

अशा आहेत सुविधा
यातअ त्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे. एका व्यक्तीला बसता येईल अशा भारतीय पद्धतीची यात व्यवस्था आहे. पाच रुपयांचे नाणे टाकल्यास दार उघडे होते. या टॉयलेटच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही. व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टायलेट वॉश होते. यात वॉश बेसीन आहे. टॉयलेटमध्ये काही अडचण अथवा कुणी मध्ये असल्यास लाल दिवा दिसते. काही अडचण नसल्यास हिरवा दिवा लागतो.
बातम्या आणखी आहेत...