आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित अत्याचाराच्या विरोधात बाईकर्स मार्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दलित अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलनतर्फे 18 जून रोजी खैरलांजी येथून बाईकर्स मार्च काढण्यात येणार आहे. खैरलांजी-औरंगाबाद-खर्डा या दरम्यान मार्चचा तेराशे कि. मी. चा प्रवास होणार असून मुंबईत 26 जून रोजी समारोप होईल. 22 जूनला मार्च औरंगाबादेत दाखल होईल. तत्पूर्वी शहरात 26 मे ते 6 जूनपर्यंत जनजागरण मेळावे होतील, अशी माहिती बुद्धप्रिय कबीर आणि दीपक कसाळे यांनी दिली.

खैरलांजीतून सकाळी आठ वाजता बाईकर्स मार्चला प्रारंभ होईल. दोनशे ते तीनशे बाईकर्स सुरुवातीला असतील. भंडारा, नागपूर, कारंजा, तिवसा, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, वाशीम, देऊळगावराजा, अंबड, गेवराई मार्गे औरंगाबादला हा मार्च येईल. येथे कॉर्नरसभा, मेळावे घेण्यात येतील, असे कबीर आणि कसाळे यांनी सांगितले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे 24 जून रोजी सडक संसदेत अनेकांची भाषणे होतील. मुंबईत 26 जून रोजी समारोप होणार असून किशोर जाधव, सिद्धार्थ जगदेव, शैलेंद्र सोनवणे, अंकुश कदम, प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे आदींच्या नेतृत्वात बाईकर्स मार्च काढला जात आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन विजय जाधव, बी. जी. गायकवाड, ज्ञानेश्वर हनुवते, सुनील लोव्हे, शिवराम म्हस्के आणि अश्विनी मोरे यांनी केले आहे.
खडर्य़ात सडक संसद
24 जून रोजी खर्डा येथे बाईकर्स मार्च पोहोचल्यानंतर सडक संसद भरणार आहे. दलित विरोधी अत्याचारांच्या वस्तुस्थितीवर प्रखर प्रकाशझोत टाकणारी श्वेतपत्रिका या वेळी प्रसिद्ध करण्यात येईल.