आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी रास्ता रोको, पणनमंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. - Divya Marathi
तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बुलडाणा- मोताळा-बुलडाणारोड वरील वाघजाळ फाट्यावर असलेल्या नळगंगा कृषी उत्पादक कंपनी येथे एसएफडीसी मार्फत सुरु असलेली तूर खरेदी बारदाण्याअभावी बंद पडलेली आहे. या प्रकरणामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज मार्च रोजी संध्याकाळी वाजेच्या सुमारास पणन मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडवून तत्काळ तूर खरेदी सुरु करण्याची मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी कंपनीचे अध्यक्ष प्रवीण जवरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच बारदाना उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच सरकारने तूर खरेदी करण्याचा कोठा वाढविला असल्याचे सांगितले. 

काही दिवस झाले बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तुर घेऊन रात्र-दिवस खरेदी केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, मोताळा-बुलडाणा रोडवरील नळगंगा कृषी उत्पादक कंपनी जवळ संतापलेल्या शेतकऱ्यांनी पणन मंत्री देशमुख यांची गाडी अडविली. यावेळी मंत्र्यांनी बारदाना लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकरी शांत झाले. 
बातम्या आणखी आहेत...