आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्डचा आजपासून बेमुदत संप सुरू, घाटीत वर्षभरातील पाचवा संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण झाल्याने घाटीत निवासी डॉक्टरांच्या संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. १९ जुलैला मध्यरात्री निवासी डॉ. सुनील लक्ष्मण कांबळे यांना मारहाण झाली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, कारवाई झाल्याने संपावर जात असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. विकास राठोड यांनी सांगितले.

१९ जुलैला रात्री वाजता काजी शेख (८०) यांना पक्षाघाताचा झटका आल्याने घाटीत दाखल केले होते. रात्री च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काजींच्या नातलगांनी डॉ. कांबळे यांना जबर मारहाण केली होती. त्यामुळे मार्डने मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करून मंगळवारपासून संपाचा इशारा दिला होता. दरम्यान, घाटी प्रशासनाच्या वतीने अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी दोषींवर कारवाईसाठी ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र, मार्डने ही विनंती धुडकावून लावत संपाची घोषणा केली आहे. संपामुळे ११७४ दाखल रुग्णांसह १६०० ते १७०० बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण वेठीस धरले जाणार आहेत. दरम्यान, रुग्णांचे हित लक्षात घेता आम्ही दरवेळी संप मागे घेतो. तासन्तास रुग्णसेवा करूनही मार खावा लागतो. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावी, असे मत डॉ. विकास राठोड यांनी मांडले.

वर्षभरातला पाचवा संप
मारहाणीमुळेमार्डचे डॉक्टर संपावर जाण्याची ही तिसरी वेळ आहे, तर वर्षभरातला हा वा संप आहे. १९० निवासी डॉक्टर घाटी रुग्णालयात काम करतात. महिन्याच्या सुरुवातीलाच विद्यावेतन, मारहाणीपासून सुरक्षा तसेच इतर अनेक मागण्यांसाठी त्यांनी संप केला होता.
बातम्या आणखी आहेत...