आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्डचा संप मागे, कामकाज पूर्ववत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपातील डाॅक्टरांच्या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी सुरू झालेला संप शुक्रवारी सायंकाळी मागे घेण्यात आला, अशी माहिती औरंगाबाद मार्डचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश चेवले यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप केला होता. १९० निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला फारसा धक्का बसला नसला तरीही बेमुदत संपामुळे आगामी काही दिवसांत याची झळ पोहाेचली असती. ही बाब लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही मागण्या तत्काळ मान्य केल्या, तर काहींना तत्त्वत: मान्यता दिली.

कामकाजावर परिणाम नाही
१९० निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेत कमतरता येऊ नये म्हणून प्रशासनाने व्यवस्थापन केले होते. आज ३३ नियुक्ती निवासी डॉक्टर, २० वैद्यकीय अधिकारी, १७ प्राध्यापक, ५९ सहयोगी प्राध्याक तर १०० सहायक प्राध्यापक असा २२९ कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत होता. घाटीत आज २१ मोठ्या तर ११ किरकोळ स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये चार सिझेरियनचा समावेश आहे.