आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: शेतीच्या वादातून युवकाचा खून,चार जणांविरुध्द गुन्हा; आसरखेडा येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शेतीच्या वादातून युवकाचा धारदार शस्त्राने मारून खून करण्यात आला. जालना तालुक्यातील अासरखेडा येथे शुक्रवारी घडली. गौतम गुलाबराव तायडे (निवडूंगा ता. जाफराबाद) असे मृताचे नाव आहे. 

संतोष लक्ष्मण वैद्य, विष्णु विश्वासराव जगताप, विठ्ठल साहेबराव जगताप (निवडूंगा) दिगंबर गोविंद बोडखे (आसरखडा) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी गौतम तायडे हा शेतातून घरी येत असताना आरोपी संतोष, विष्णु, विठ्ठल दिगंबर यांनी त्याला गाठले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन दगड, काठी धारदार शस्त्राने वार करून गौतमला जिवे मारले. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चौकशी करून यात खुनासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...