आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market Committee Election, Fight Between Congress And BJP

काँग्रेस-भाजपमध्ये सरळ लढत; बंडखोरीची डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार असून काँग्रेस-भाजप अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसचे दोन पॅनल भाजपसाठी जमेची बाजू, तर भाजपचे बंडखोर उमेदवार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

एकूण १८ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य हजार ५९३ मतदार निश्चित करतील. औरंगाबाद बाजार समितीत औरंगाबाद तालुक्यासह विविध जिल्हे आणि परराज्यातून दररोज शेकडो टन शेतमाल, किराणा, जनरल माल विक्रीसाठी येतो. वर्षाला ६०० कोटींच्या वर उलाढाल होत असल्याने राजकारण, समाजकारणाबरोबरच अर्थकारणाच्या दृष्टीनेही समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. १९५८ ते २००४ पर्यंत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. २००५ ते २०१० ही पाच वर्षे भाजपकडे सत्ता होती. २०१० ते एप्रिल २०१५ पर्यंत प्रशासकीय काळ होता. १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे विलास औताडे यांचे दोन पॅनल निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आ. तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्व नवीन उमेदवारांना संधी दिल्यामुळे संजय औताडे यांनी नाराज होऊन बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिले आहे, पण ही निवडणूक बागडे विरुद्ध काळे अशी प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी, तर भाजपने ती टिकून ठेवण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. आज मतदारांचा कौल मतपेटीत बंद होईल.

मतदारसंघनिहाय एकूण जागा, उमेदवार आणि मतदारांचे विवरण
एकूण १८ जागांसाठी , ८१ उमेदवार, ३ हजार ५९३ मतदार
व्यापारी मतदारसंघात चुरस
व्यापारीमतदारसंघात दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १२९१ मतदार असून ४०० च्या वर मुस्लिम मतदार आहेत. त्यांचे मत मुस्लिम उमेदवारांनाच जाणार असल्याचा कयास इतर उमेदवारांनी बांधला आहे. त्यामुळे उर्वरित ८०० मतांचे आठ उमेदवारांमध्ये विभाजन होईल, असे गणित आखून उमेदवार विजयासाठी रणनीती आखत आहेत.

उद्या निकाल
जाधववाडीशेतकरी भवनात १३ जुलैला मतमोजणी होऊन दुपारी वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

येथे होईल मतदान
जाधववाडीमुख्य बाजार, चौका, लाडसावंगी, करमाड, वरूड काजी, शेकटा, पिंप्रीराजा, चित्तेगाव, कचनेर, पंढरपूर, दौलताबाद जि. प. शाळेत सहकारी संस्था, ग्र.पं., व्यापारी मापाडी मतदारसंघासाठी सकाळी ते वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मतदारसंघाचे नाव : सहकारी संस्था
प्रवर्ग: सर्वसाधारण. एकूण जागा : ०७, उमेदवार : २८, मतदार : 00.
प्रवर्ग : महिला, एकूण जागा: ०२ उमेदवार : ०६, मतदार : 00.
प्रवर्ग : इतर मागास वर्ग, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०५, मतदार : 00.
प्रवर्ग : विमुक्त जाती भटक्या जमाती, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०५, मतदार : 00.
एकूण - जागा : ११, उमेदवार : ४४, मतदार : ९२९

मतदारसंघाचेनाव : ग्रामपंचायत
प्रवर्ग: सर्वसाधारण. एकूण जागा : ०२, उमेदवार : १४, मतदार :00.
प्रवर्ग : अनु. जाती जमाती, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०६, मतदार : 00.
प्रवर्ग : आर्थिक दुर्बल घटक, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०३, मतदार : 00.
एकूण - जागा : ०४, उमेदवार : २३, मतदार : ९५२.

मतदारसंघाचेनाव : व्यापारी संघ
Market committee Election, Fight between Congress and BJP
काँग्रेस-भाजपमध्ये सरळ लढत; बंडखोरीची डोकेदुखी

संतोष देशमुख | औरंगाबाद
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार असून काँग्रेस-भाजप अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसचे दोन पॅनल भाजपसाठी जमेची बाजू, तर भाजपचे बंडखोर उमेदवार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

एकूण १८ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य हजार ५९३ मतदार निश्चित करतील. औरंगाबाद बाजार समितीत औरंगाबाद तालुक्यासह विविध जिल्हे आणि परराज्यातून दररोज शेकडो टन शेतमाल, किराणा, जनरल माल विक्रीसाठी येतो. वर्षाला ६०० कोटींच्या वर उलाढाल होत असल्याने राजकारण, समाजकारणाबरोबरच अर्थकारणाच्या दृष्टीनेही समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. १९५८ ते २००४ पर्यंत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. २००५ ते २०१० ही पाच वर्षे भाजपकडे सत्ता होती. २०१० ते एप्रिल २०१५ पर्यंत प्रशासकीय काळ होता. १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे विलास औताडे यांचे दोन पॅनल निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आ. तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्व नवीन उमेदवारांना संधी दिल्यामुळे संजय औताडे यांनी नाराज होऊन बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिले आहे, पण ही निवडणूक बागडे विरुद्ध काळे अशी प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी, तर भाजपने ती टिकून ठेवण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. आज मतदारांचा कौल मतपेटीत बंद होईल.

मतदारसंघनिहाय एकूण जागा, उमेदवार आणि मतदारांचे विवरण
{एकूण १८ जागांसाठी {८१ उमेदवार {३ हजार ५९३ मतदार
व्यापारी मतदारसंघात चुरस
व्यापारीमतदारसंघात दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १२९१ मतदार असून ४०० च्या वर मुस्लिम मतदार आहेत. त्यांचे मत मुस्लिम उमेदवारांनाच जाणार असल्याचा कयास इतर उमेदवारांनी बांधला आहे. त्यामुळे उर्वरित ८०० मतांचे आठ उमेदवारांमध्ये विभाजन होईल, असे गणित आखून उमेदवार विजयासाठी रणनीती आखत आहेत.

उद्या निकाल
जाधववाडीशेतकरी भवनात १३ जुलैला मतमोजणी होऊन दुपारी वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

येथे होईल मतदान
जाधववाडीमुख्य बाजार, चौका, लाडसावंगी, करमाड, वरूड काजी, शेकटा, पिंप्रीराजा, चित्तेगाव, कचनेर, पंढरपूर, दौलताबाद जि. प. शाळेत सहकारी संस्था, ग्र.पं., व्यापारी मापाडी मतदारसंघासाठी सकाळी ते वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मतदारसंघाचे नाव : सहकारी संस्था
प्रवर्ग: सर्वसाधारण. एकूण जागा : ०७, उमेदवार : २८, मतदार : 00.
प्रवर्ग : महिला, एकूण जागा: ०२ उमेदवार : ०६, मतदार : 00.
प्रवर्ग : इतर मागास वर्ग, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०५, मतदार : 00.
प्रवर्ग : विमुक्त जाती भटक्या जमाती, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०५, मतदार : 00.
एकूण - जागा : ११, उमेदवार : ४४, मतदार : ९२९

मतदारसंघाचेनाव : ग्रामपंचायत
-प्रवर्ग: सर्वसाधारण. एकूण जागा : ०२, उमेदवार : १४, मतदार :00.
-प्रवर्ग : अनु. जाती जमाती, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०६, मतदार : 00.
-प्रवर्ग : आर्थिक दुर्बल घटक, एकूण जागा : ०१, उमेदवार : ०३, मतदार : 00.
-एकूण - जागा : ०४, उमेदवार : २३, मतदार : ९५२.

मतदारसंघाचेनाव : व्यापारी संघ
एकूणजागा : ०२, उमेदवार : ११, मतदार : १२९१.
मतदारसंघाचेनाव : हमाल-मापाडी संघ
एकूणजागा: ०१, उमेदवार: ०३, मतदार: ४२१.
एकूणजागा : ०२, उमेदवार : ११, मतदार : १२९१.
मतदारसंघाचेनाव : हमाल-मापाडी संघ-एकूणजागा: ०१, उमेदवार: ०३, मतदार: ४२१.