आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीच्या सत्तास्थापनेत अडचणी; आता अपक्षांवर नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. सभापतिपदासाठी दोन्ही पक्षांत प्रत्येकी दोन आणि एक बंडखोर असे पाच सदस्य स्पर्धेत आहेत. कोणालाच बहुमत नसल्याने अपक्ष आणि व्यापारी सदस्यांना आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न असून अडीच-अडीच वर्षे सत्ता उपभोगण्याच्या फॉर्म्युल्यावर एकमत होऊ शकते.

बाजार समिती निवडणुकीचा निकाल १४ जुलै रोजी जाहीर झाला. काँग्रेस ७, भाजप ६, बंडखोर २, व्यापारी आणि हमाल मापाडी असे १८ सदस्य निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत कुणालाच मिळाले नसल्याने गुंतागुंत वाढली आहे. बंडखोर व्यापारी सदस्यांना सध्या भाव आला आहे. त्यांच्याच पाठिंब्यावर काँग्रेस किंवा भाजपला सत्ता स्थापन करता येऊ शकेल. काँग्रेसला तीन भाजपला चार सदस्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाचे दिग्गज रणनीती आखत आहेत.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पावसाळी अधिवेशनात व्यग्र आहेत. तर माजी आमदार डॉ. कल्याण काळे फुलंब्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतले आहेत. निकालानंतर २१ दिवसांचा कालावधी हाती असल्याने दोन्ही पक्षांचे धुरंधर सत्ता हातची जाऊ नये यासाठी सावध पाऊल टाकत आहेत.

भाजपकडे सहा सदस्य असून आणखी चार सदस्यांची गरज आहे. व्यापारी हमाल मापाडी असे तीन सदस्य सोबत घेतल्यास संख्या होईल. काँग्रेसचे सात सदस्य आहेत. त्यांना बंडखोर येऊन मिळाले तर त्यांची संख्याही होईल. भाजपला राज्य, देशातील सत्ता असल्याने विकासकामांचे आमिष दाखवून तिकीट नाकारलेल्या बंडखोर भाजप समर्थक आणि व्यापारी, हमाल मापाडी यांना सोबत घेऊन स्थिर सत्ता स्थापन करणे शक्य आहे. त्यासाठी प्रथम जुन्या मोंढयात जाऊन प्रथम व्यापारी सदस्यांना गळ घातली जात आहे.

मला सभापती व्हायचे
हरिभाऊ बागडे डॉ. काळे यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाने मला डावलल्याने अपक्ष निवडणूक लढलो. मतदारांनी मला विक्रमी मतदान करून सर्वाधिक पसंती दिली आहे. मला सभापती व्हायचे आहे. दांडगे माझ्या सोबतच आहेत. संजयऔताडे, सदस्य.

भाजपपेक्षा, काँग्रेस प्रबळ दावेदार
काँग्रेसचीसदस्य संख्या सात आहे. सत्तेसाठी त्यांना आणखी तीन सदस्यांची गरज आहे. हे गणित जुळवण्यासाठी अपक्ष उमेदवारांना बाजूला ठेवून व्यापारी मतदारसंघातून विजयी झालेले हरिशंकर दायमा प्रशांत साकिया, हमाल मापाडी सदस्य देविदास कीर्तिशाही यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची काँग्रेसला उत्तम संधी आहे. हे गणित जमले नाही तर बंडखोर संजय औताडे यांना अडीच वर्षासाठी सभापतिपद देऊन विकास दांडगे एक हमाल मापाडी यांना बरोबर घेऊन समितीवर पुन्हा वर्चस्व स्थापन करता येईल. भाजपपेक्षा एक जागा जास्त जिंकल्याने काँग्रेस प्रबळ दावेदार आहे.

यापैकी एक सभापती होईल!
- काँग्रेस : नारायणमते, गणेश दहिहंडे
- भाजप: रघुनाथकाळे, दामोदर नवपुते
- भाजपबंडखोर : संजय औताडे
बातम्या आणखी आहेत...