आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market Committee Starts Mess For Rural Students Agricultur Minister Vikhe

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बाजार समित्यांनी अन्नछत्र सुरू करावे - कृषिमंत्री राधाकृष्ण विखे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहू नयेत म्हणून अल्पदरात अन्नछत्र सुरू करण्याची सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना केली. यासाठी कॉलेजांकडून माहिती घ्यावी व दुष्काळ नसलेल्या भागातील समित्यांनी दुष्काळी भागात हा उपक्रम हाती घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजार समित्यांनी करायच्या उपाययांवर समिती सभापती, सचिवांची बैठक झाली. चारा छावण्यांना प्राधान्य द्यावे, नंतर जनावरांसाठी पाणी बघावे. नंतर विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र, भोजनावळी सुरू कराव्यात, व मार्च, एप्रिलपर्यंत सुरू ठेवाव्यात असे पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले. राज्यात 280 समित्या आहेत. टंचाई निवारण कामात कृषी खात्याचा वाटा 5 टक्के असून तो 30 टक्क्यांपर्यंत नेण्याची गरजही विखे यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, अन्नछत्रे बंधनकारक नाहीत. हे चॅरिटीचे काम आहे. यासाठी रेशन, गोदामातील धान्य देण्याचा प्रश्न नाही, असे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. तसेच पणन संचालकांची मान्यता मिळाली की पुढील सोपस्कार सोपे जातील, असे औरंगाबाद बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कोळगे यांनी स्पष्ट केले.