आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यबळ क्षेत्रात लवकरच अच्छे दिन : मर्लापल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपल्या देशात आंतरराष्ट्रीय उद्योग येत असून त्यामुळे रोजगारदेखील उपलब्ध होत आहेत. येणाऱ्या काळात मनुष्यबळ विकास क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी असल्याचे चित्र आहे, असा विश्वास निवृत्त न्यायमूर्ती बी. एच. मर्लापल्ले यांनी व्यक्त केला. एनआयपीएमच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या पश्चिम विभागीय परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. परिषदेचे उद्घाटन निवृत्त न्यायमूर्ती बी. एच. मर्लापल्ले यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर एनआयपीएमचे नॅशनल प्रेसिडेंट सोमेश दासगुप्ता, औरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष राम मर्लापल्ले, सचिव सुनील सुतवणे, विभागीय उपाध्यक्ष मनोज गुप्ता आणि परिषदेचे समन्वयक उल्हास भूमकर यांची उपस्थिती होती.

मर्लापल्ले म्हणाले की, एचआर विभागापुढे अनेक आव्हाने आहेत. आपण जागतिकीकरण आणि उदारीकरणाला स्वीकारले. उद्योग आणि खासगी रोजगार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले. ज्या-ज्या उद्योगांनी एचआर पॉलिसीत वेळोवेळी बदल घडवून आणले त्यांना त्याचे फायदे दिसून आले. महानगरांमध्ये एचआर विभागात खूप साऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मोदींनी मेक इन इंडियाची हाक देत कौशल्यपू्र्ण विकासावर भर दिला आहे. क्रूड ऑइलच्या किमती घसरल्या. शेअर बाजाराने अभूतपूर्व अशी झेप घेऊन २९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय अर्थव्यवस्था भक्कम होत असल्याचे हे संकेत आहेत, असेही ते म्हणाले.

३५० जणांचा सहभाग : या दोनदिवसीय परिषदेत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांतील ९ चॅप्टरमधील ३५० प्रतिनिधी सहभागी झाले असून अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.