आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंडणगावजवळ वऱ्हाडाचा टेम्पाे उलटून १ ठार, १५ जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने एक ठार, तर पंधरा जण जखमी झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव-मांडणा रस्त्यावरील वळणावर शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तानाजी गोपाल भोजने (६५, रा. बोरमाडा, ता. सोयगाव) मृताचे नाव आहे.

सोयगाव तालुक्यातील बोरमाडा येथून २० ते २५ जणांचे वऱ्हाड घेऊन टेम्पो (क्रमांक एमएच १९ एस ३०५५) लग्नासाठी सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे जात होता. दरम्यान, उंडणगाव-मांडणा रस्त्यावरील एका वळणावर टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. यात तानाजी भोजने हे जागीच ठार झाले, तर विठ्ठल पांडुरंग काटकर (२०), समाधान बनसोडे (१२), नामदेव ठकाजी साळवे (५१), देवबा साबळे (७५), राहुल नामदेव दाभाडे, अप्पा बाबूराव जेठे (५०), एकनाथ यादवराव ढेपले (२१) दिगंबर देविदास कोलते, रामेश्वर शेषराव गोरे सर्व रा. बोरमाडा, ता सोयगाव, विजय यादवराव गोरे (२१, रा. चिखलठाण, ता. कन्नड), रामू पुंडलिक गारे (३०, रा. भराडी)३०, युसूफ जफर तडवी (६५, रा. घाटनांद्रा) व अन्य दोन जखमी झाले अाहेत.

जखमीवर सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून विठ्ठल काटकर, समाधान बनसोडे, नामदेव साळवे, देवबा साबळे, विजय गोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याप्रकरणी घटनेची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.