आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या लग्नातील खर्चाला फाटा; बेघरांना बांधून दिली ९० टुमदार घरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - लग्न म्हटलं की गाजावाजा व खर्च अालाच. वधू अाणि वरपक्षाची गडबड,अाहेरांची रेलचेल, जेवणावळी अाणि श्रीमंतीच्या बडेजावासाठी केलेली नेत्रदीपक अातषबाजी असे साधारणत: दिसणारे वातावरण. परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे सोमवारी आगळा-वेगळा लग्न सोहळा पार पडला. लासूरच्या मुनाेत परिवाराने अापल्या मुलीच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ९० कुटुंबांना टुमदार घरे देऊन हक्काचा निवारा दिला आहे.

अजय मुनाेत यांनी कन्या श्रेयाचा विवाह वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चयच केला होता. गंगापूर- खुलताबादचे अामदार प्रशांत बंब यांचे मुनाेत कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध अाहेत. काहीतरी वेगळे करायचे तर ते समाजाेपयाेगी असावे अशी त्यांनी संकल्पना मुनाेत कुटुंबीयांच्या पुढ्यात मांडली. ती सर्वांनाच पटली व १०८ बेघरांना घरे देण्याचा संकल्प या परिवाराने सोडला. मुनाेत यांनी लासूरपासून या परिसरात वनरूम किचनची ९० टुमदार घरे बांधली. त्यासाठी अंदाजे दीड काेटींचा खर्च लागल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे अाहे.

कलानेमीनगर म्हणजे छोटेखानी गावच !
श्रेयाच्या लग्नाच्या खर्चातून नागपूर-मुंबई महामार्गावर हाकेच्या अंतरावरील आरापूर शिवारात उभारलेले कलानेमीनगर ही वसाहत मध्यमर्गीयांच्या वसाहतीसारखीच अलिशान आहे. जणू एक छोटेसे टुमदार गावच. या वसाहतीत बारा बाय वीस क्षेत्रफळाची ९० वनरुम किचनची एकसारखी दोन दरवाजे खिडक्यांची घरे रंगरंगोटी लाईट फिटिंगसह बांधून देण्यात आली आहे. विषेश म्हणजे येथे राहणाऱ्या लोकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर प्लांटची व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजासाठी काही केल्याचा अानंद : अापण समाजासाठी काही देणे लागताे या विचाराचे संस्कार अामच्यावर लहानपणापासूनच झाले अाहेत. समाजातील तळागाळातील लाेकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा हाेती. लग्न ठरल्यानंतर मी माझ्या जाेडीदारालाही ही संकल्पना सांगितली. त्यांनीही माझ्या या उपक्रमाला पाठिंबा दिला. अापण समाजासाठी काही तरी केलं याचा अाज खूप अानंद हाेताेय, असे श्रेया मुनोत या नवविवाहितेने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...