आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासअडसर ठरणाऱ्या पित्याविरुद्ध गुन्हा, मुलाने दिली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लग्नासअडसर ठरणाऱ्या पित्याच्या विरोधात मुलाने चक्क पोलिसात तक्रार दिली. एवढेच नव्हे तर आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत, आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी एका प्रेमीयुगुलाने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
शहानूरवाडी येथील १९ वर्षांची तरुणी आणि सिटी चौक भागातील २५ वर्षीय तरुणाचे प्रेमसंबंध आहेत. त्यांना लग्नही करायचे आहे. पण मुलाच्या पित्याला ते मान्य नाही. कारण त्यांच्यामध्ये पोटजातीचा वाद निर्माण झाला आहे. मुलाच्या कुटुंबीयांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून दोघांनीही पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली. माझे वडील आणि सावत्रभाऊ आम्हाला त्रास देत असल्याचे तरुणाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना एसएमएस करूनही होत असलेल्या त्रासाची कल्पना दिली. त्यांनी या दोन्ही कुटुंबीयांना आयुक्तालयात बोलावून समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तरुणीने २३ मार्च रोजी शिवीगाळ केली म्हणून उस्मानपुरा ठाण्यात मुलाच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरुद्ध तक्रार दिली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.