आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला जाण्यासाठी नागोबा सर्वात आधी नवरदेवाच्या गाडीत बसले; वऱ्हाडी मंडळींची पंचायत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- येथील तरुणाच्या लग्नाचे वऱ्हाड आगंतुक नागाने तब्बल दीड तास रोखून धरले. नवरदेव किरायाने घेतलेल्या स्कॉर्पिओ वाहनात बसणार त्यापूर्वीच या वाहनात साप जाऊन बसल्याने वऱ्हाडींना दीड तास खोळंबून बसावे लागले. शेवटी दुसऱ्या वाहनाने वऱ्हाडी गेल्यानंतर या नागोबाने हे वाहन सोडले.  
 
रविवारी सकाळी बोधेगाव येथे विवाह सोहळ्यासाठी निघण्याची वराकडील मंडळीची लगबग सुरू होती. सकाळी नवरदेवासाठी किरायाने स्कॉर्पिओ गाडी मागवण्यात आली. या गाडीच्या सजावटीच्या कामावर  शेवटचा हात फिरवत असताना अचानक एक नाग या वाहनाच्या मागील बाजूने आत शिरला.  नाग वाहनात शिरल्याचे पाहून चालकासह सर्व जण घाबरले.  त्याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड खटाटोप करण्यात आला. मात्र, तो दडून बसला. सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने आणि नागाला हुसकावण्यात दीड तास वाया गेल्याने शेवटी कंटाळून  नवरदेवासाठी दुसरे वाहन मागवण्यात आले आणि वऱ्हाड बोधेगावला निघाले. वऱ्हाड गेल्यानंतर नागोबाने तब्बल तीन तासांनंतर स्कॉर्पिओचा ताबा सोडला.  
बातम्या आणखी आहेत...