आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Against The Will Youth Run Out Of House, Divya Marathi

मर्जीविरुद्ध लग्न ठरवल्याने धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आई-वडील मर्जीविरुद्ध लग्न करून देत असल्याने वाळूज येथील युवकाने लग्नाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना धूम ठोकली. आता त्यांच्या कुटुंबीयांनी वाळूज पोलिसांना त्याला शोधण्यासाठी साकडे घातले आहे. दिलीप गुंजाळ (21) असे त्या युवकाचे नाव असून तो वाळूज येथील साठेनगरात राहतो.

दिलीप हा मंडप लावणार्‍यांकडे वडिलांसोबत मजुरीचे काम करतो. 8 मे रोजी नात्यातील एका तरुणीशी त्याचे लग्न होणार होते. त्याने त्या तरुणीशी लग्न करणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. शेवटी लग्नाच्या सहा दिवस आधी म्हणजे 3 मे रोजी त्याने धूम ठोकली. तो अद्याप परत आला नाही. यामुळे हवालदिल झालेले त्याचे वडील राजाराम गुंजाळ यांनी वाळूज पोलिस ठाणे गाठून दिलीप बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तसेच त्याचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली. त्याची उंची 5 फूट, रंग गोरा, अंगात पँट, शर्ट असून त्याला तंबाखू आणि बार खाण्याची सवय आहे. सदरील वर्णनाचा तरुण कोणास आढळल्यास त्यांनी वाळूज पोलिस ठाण्याच्या 2240560 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल ए. एस. बोराडे करत आहेत.