आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Conflict With The Suicide Of Her Husband

पतीसोबत भांडण विवाहितेची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पतीशी भांडण झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. अर्चना स्वप्निल महानोर (20, रा. मुकुंदवाडी) असे तिचे नाव असून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सहा महिन्यांपूर्वी अर्चनाचे सोलापूर जिल्ह्यातील धामणगाव येथील स्वप्निल महानोर याच्याशी लग्न झाले होते. पतीशी पटत नसल्याने संक्रांतीनिमित्त आलेली अर्चना सासरी परत गेली नाही. शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास तिने पत्र्याच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. दहा वाजले तरी दरवाजा उघडत नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला आवाज दिला; परंतु आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडत कुटुंबीयांनी खोलीत प्रवेश केला. तेव्हा तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह घाटीत नेण्यात आला. याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत करत आहेत.