आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी मुकुंदनगर येथील विवाहिता त्रिपुरीकरण बहादूर ठाकूर (३६) हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बहादूर ठाकूर हा शहरात खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्रिपुरीकरण ही त्याची पत्नी असून तो शुक्रवारी रात्रपाळीसाठी गेला होता. सकाळी घरी आल्यानंतर तो बँकेचा हप्ता भरण्यासाठी गेला, तर मुलाची परीक्षा सुरू असल्यामुळे ती घरात एकटीच होती. त्याच वेळी तिने छताच्या हुकाला ओढणी लावून गळफास घेतला.
पती बहादूर घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उपचारासाठी तिला तत्काळ घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उपचाराच्या वेळी तिच्या हातात एक रुमाल होता. रुमालात एक कागद असून त्यावर एका व्यक्तीचे नाव मोबाइल क्रमांक लिहिलेला होता.
पुढे वाचा... पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा