आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला स्वयंपाकघरात झालेल्या गॅसच्या स्फोटात पोलिस मुख्यालयातील हवालदार संतोष केवारे (38) आणि त्यांची मैत्रीण संगीता पारस बोरा (38) दोघे भाजून गंभीर जखमी झाले. या घटनेत संगीता यांचा गुरुवारी सायंकाळी घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर केवारे घाटीत मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजता शिवाजीनगर (सी सेक्टर) येथे घडली.
कौटुंबिक कलहामुळे पतीपासून विभक्त झालेल्या संगीता माहेरी राहत होत्या. हवालदार केवारे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांचे घरी येणे-जाणे होते. नेहमीप्रमाणे केवारे बुधवारी संगीताच्या घरी गेले. स्वयंपाकघरात पूर्वीपासूनच गॅस गळती सुरू होती. दरम्यान, संगीताने गॅस पेटवताच स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. या स्फोटात संतोष 40, तर संगीता 70 टक्के भाजले. दोघांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान संगीताचा मृत्यू झाला.
मृत संगीताला एक मुलगी असून ती नेवासा येथे शिक्षण घेत आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश नरवडे तपास करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.